सुधीर मुनगंटीवार यांचे आजोळी दमदार स्वागत

18 Apr 2024 20:21:46
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, अजित पवार राकाँ, रिपाई (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या आजोळी म्हणजेच बोरगावात दमदार स्वागत झाले.
 
 

y18Apr-Borgav
गावात प्रवेश करताच बंजारा बांधवांनी पारंपरिक डफळीवादन करून व भगिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने मुनगंटीवार काही क्षण भावूक झाले. मला आज माझ्या आजोळी प्रचार करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो, असे ते यावेळी म्हणाले. आर्णी तालुक्यातील बोरगाव हे सुधीर मुनगंटीवार यांच्या मातोश्री चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे माहेर आहे. लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्या की ते उन्हाळ्यात महिनाभरासाठी आजोळी मुक्कामाला येत असत. गावचा नातू ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा भन्नाट प्रवास केलेल्या सुधीरभाऊंची आजोळबद्दलची ओढ परत एकदा बोरगावकरांना अनुभवायला मिळाली.
 
 
 
यावेळी जाहीर सभेत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लहानपणी येथील बंजारा समाजातील माता-भगिनींनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. गावकèयांचे माझ्यावर मोठे ऋण असून ते मला येथील लोकांचा विकास साधून फेडायचे आहे. भरघोस मतदान करून तुम्ही ती संधी द्याल, असा विश्वास आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Powered By Sangraha 9.0