लोकसभेत परिवर्तन तुम्हीच करणार : आदित्य ठाकरे

02 Apr 2024 20:29:47
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Aditya Thackeray-Sanjay Deshmukh : यवतमाळ-वाशिम लोकसभेची ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याने ही निवडणूक तुमची झाली असून, परिवर्तन तुम्हीच करणार असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
 
 
y2Apr-Aaditya
 
 
मंगळवार, २ एप्रिल रोजी पोस्टल मैदानावर ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांचे नामांकन दाखल करण्यासाठी ते यवतमाळात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे, जिपचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, उबाठा शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारी, माजी मंत्री वसंत पुरके, लोकसभा उमेदवार संजय देशमुख इत्यादी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
 
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, संजय देशमुख हे तुमच्यातला एक माणूस आहे. महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली असून त्यांना दिल्लीला पाठविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही ती जबाबदारी पूर्णसुद्धा करणार असल्याची खात्री मला आहे.
आपले सरकार राज्यात जेव्हा होते, तेव्हा आपण शेतकèयांची कर्जमाफी केली. या सरकारने केवळ आश्वासन देऊन शेतकèयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
 
यावेळी आमदार रोहित पवार सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले, महायुतीजवळ उमेदवार नाही, त्यामुळे त्यांनी अद्यापही उमेदवार जाहीर केला नाही. कुटुंब व पक्ष फोडून राजकारण होत नसते, हे आता त्यांना कळेल. राज्य सरकारने शेतकèयांच्या झालेल्या नुकसानाचे पैसे अद्यापही दिले नाही, फक्त आश्वासन देत आहे.
 
या मतदारसंघाच्या खासदारांनी शेतकèयांसाठी काय केले, असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. खासदार एवढ्या दिवसांत मतदारसंघात दिसल्या का, असेही रोहित पवार यांनी विचारले.
 
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन दिले. यवतमाळातील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणार असून, नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याचे वचन यावेळी त्यांनी जनतेला दिले.
Powered By Sangraha 9.0