हिंगोली लोकसभेची वंचितची उमेदवारी

02 Apr 2024 16:43:06
हदगाव, 
Hingoli Lok Sabha हिंगोली लोकसभा करिता ठाकरे गटाचे युतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार नागेश आष्टीकर तर शिवसेना qशदे गटाचे युतीचे उमेदवार म्हणून खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. परंतु या मतदारसंघातून वंचित कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून होते. याची प्रतीक्षा संपली असून वंचितकडून हिंगोली लोकसभे करिता डॉ. बिडी चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे.
 

Hingoli Lok Sabha  
 
डॉ. बिडी चव्हाण यांना पूर्वीपासून  Hingoli Lok Sabha हिंगोली लोकसभा मतदारसंघ ओळखीचा असल्याने राष्ट्रीय पक्षाच्या दोन्ही युतीच्या उमेदवारांना डॉ. बिडी चव्हाण हे चांगली लढत देतील अशी शक्यता वर्तवल जात आहे. यापूर्वीचा हिंगोली लोकसभेचा मतदारसंघाचा अभ्यास करता वंचितला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
 
Powered By Sangraha 9.0