चतुर्भुज भगवान विष्णूंची आयुधे आणि नामविशेष !

02 Apr 2024 19:52:49
धर्म-संस्कृती
 
- दिलीप जोशी
Washim-Balaji-Mehkar भगवान विष्णू यांचे स्वरूप डोळ्यांसमोर येताच चतुर्भुज नारायण दिसतात. त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधे असतात. Washim-Balaji-Mehkar यातील दोन आयुधे म्हणजे चक्र आणि गदा हे दृष्टांचे निर्दालन आणि साधूंचे रक्षण करणारे युद्धसिद्ध शस्त्र आहेत तर पद्म म्हणजे कमळ आणि शंख ही दोन्ही आयुधे सकारात्मक संवाद, शस्त्र अंतर्नादाची, शांतीची आयुधे आहेत.Washim-Balaji-Mehkar
पडता जड भारि, दासी आठवावा हरी।
मग तो होऊ ने दी क्षिण! आड घाली सुदर्शन! Washim-Balaji-Mehkar
 
 
 
Washim-Balaji-Mehkar
 
 
दुष्टांचे निर्दालन आणि भक्तांचे रक्षण यासाठी गदा आणि चक्र ही आयुधे भगवंतांच्या हातात आहेत. सुदृढ, सबल आणि सक्षम समाजनिर्मिती हे गदा आणि चक्र सांगतात. Washim-Balaji-Mehkar तर कमळ आणि शंख हे चित्शक्तीची प्रतीके आहेत. कमळ म्हणजे निरंतरता, शुचित्व, आत्मविद्या. कमळ आणि शंख म्हणजे नाद, माधुर्य आणि ओज. कमळ म्हणजे सहस्त्राधार. मुलाधारापासून विविध चक्रांना भेदत सहस्त्राधारापर्यंत जाणारी कुंडलिनी जगदंबा म्हणजे कमळ. Washim-Balaji-Mehkar प्रज्ञाशक्ती आणि पंडाबुद्धी जागृत असलेला समाज म्हणजे शंख पद्म होय. भगवान विष्णूंच्या हातातील या चारही आयुधांचे विशेष नाम प्रयोजन आहे. देशभरात चतुर्विध आयुधे असणारी चतुर्भुज भगवान विष्णू मंदिरे प्रसिद्ध आहेत.Washim-Balaji-Mehkar 
 
 
तिरुपती, तिरुअनंतपुरम्, जगन्नाथपुरी, द्वारका अशी हजारो ठिकाणे सुप्रसिद्ध आहेत. विदर्भात वाशीम, मेहकर, देऊळगाव राजा, आकोट येथेही विष्णू भगवान श्री बालाजी नावाने विराजमान आहेत. त्यांची स्वतःची वेगवेगळी नावे आहेत. उदा. वाशीमचे श्री बालाजी हे जनार्दन स्वरूप आहेत. Washim-Balaji-Mehkar आकोटचे श्री केशवराज आहेत. तिरुपतीला गोविन्द, जनार्दन आहेत. मेहकरला शारंगधर (त्रिविक्रम) स्वरूपात आहेत. पोखर्णीला श्री बालाजी नरसिंह रूपात आहेत. पद्मनाभ मंदिर तर जगप्रसिद्ध आहेत. सहजपणे पाहिले तर सर्वांचे स्वरूप बहुतेक सारखेच. Washim-Balaji-Mehkar सर्वच मूर्ती विष्णुस्वरूप आहेत. आकारात आणि उंचीतील फरक सोडला तर सर्व मूर्ती दिसायला समान आणि हुबेहूब वाटतात. लौकिकार्थाने समसमान आहेत.
 
 
सर्व विष्णुमूर्ती सारख्याच आहेत तर मग त्यांची नावे भिन्न का? हा साहजिक प्रश्न अनेकांना पडतो. त्याचा विचार करू. भगवान विष्णू चतुर्भुज नारायण आहेत. म्हणजे त्यांना चार हात आहेत. Washim-Balaji-Mehkarप्रत्येक हातात एक असे चार आयुधे आहेत. म्हणजे त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत. या आयुधांची हातातील स्थिती एकूण २४ वेळा बदलता येते. गणितीय शास्त्रात त्याला फॅक्टोरियल म्हणतात. इथे चार हात असल्याने फॅक्टोरियल फोर म्हणजे ४. म्हणजे गणितीय सूत्रात ४*३*२*१=२४. Washim-Balaji-Mehkar साध्या भाषेत भगवंताच्या हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म एकूण २४ वेळा निरनिराळ्या हातात देता येते. त्या आयुधांच्या हातातील स्थितीवरून भगवंताची २४ नावे आहेत. पूजेची सुरुवात करताना आचम्य या नावांनी केल्या जाते आणि जठराग्नी शांत केला जातो.
 
 
 
Washim-Balaji-Mehkar ‘ॐ केशवाय नमः स्वाहा, ॐ माधवाय नमः स्वाहा, ॐ गोविंदाय नमः, विष्णवे नमः' ही २४ नावे आपण आचमनासाठी घेतो. केशव, माधव, नारायण, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, हृषीकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नृसिंह, जनार्दन, अच्युत, उपेन्द्र, वासुदेव, प्रद्युम्न, हरी, श्रीकृष्ण अशी ती नावे आहेत. ही नावे मूर्तीच्या हातातील आयुधांच्या स्थानावरून आहेत. उदा. भगवंताचे केशवराज स्वरूप म्हणजे ज्या मूर्तीच्या उजव्या वरच्या हाताला शंख (दक्षिण ऊर्ध्व  हस्त), उजव्या खालील हाताला (दक्षिण अधरहस्त) पद्म तसेच डाव्या वरील हातात (वाम ऊर्ध्व हस्त) चक्र आणि डाव्या खालील हातात (वाम अधर हस्त) गदा आहे. Washim-Balaji-Mehkar आकोटच्या केशवराजाची मूर्ती अशीच आहे. आता जनार्दन स्वरूपातील बालाजी मूर्ती पाहिली तर तिच्या उजव्या वरील हातात चक्र आहे तर उजव्या खालील हातात पद्म. डाव्या वरील हातात शंख तर डाव्या खालील हातात गदा आहे. देशभरात अवघ्या जनार्दन मूर्ती शंख-चक्र-गदा-पद्म अशाच स्थितीत आहेत. वाशीमचे जनार्दन बालाजी स्वरूप असेच आहे. खरं सांगायचं तर तिरुपती व्यंकटेश जनार्दनच आहेत.
 
 
 
मेहकरचे शारंगधर त्रिविक्रम रूपात आहेत. Washim-Balaji-Mehkar त्रिविक्रम स्वरूपात उजव्या वरील हातात गदा तर खालील हातात पद्म आहे आणि डाव्या वरील हातात चक्र तर खाली शंख आहे. भगवंताचे एक नाव ‘अधोक्षज' आहे. या मूर्तीत उजव्या वरील हातात गदा आणि खालील हातात पद्म तर डाव्या वरील हातात शंख आणि खालील हातात चक्र आहे. विस्तारभयाने सर्व नावे टाळतो. थोडक्यात हातातील आयुधांच्या स्थानावरून भगवंताची नावे ठरली आहेत. Washim-Balaji-Mehkar ज्या नावाची मूर्ती त्यांची आयुधे देशभरात सर्वत्र तशाच स्थितीत आढळतील. देशभर गोविंदराज, शारंगधर, केशवराज अशा विविध २४ प्रकारे विष्णुनारायण भगवंताच्या मूर्तीच्या हातातील आयुधे फिरविता येतात. त्या त्या नावानुसारच ही आयुधे त्या त्या हातात असतात. त्यावरून त्या मूर्तीचे स्वरूप नाम ठरते. Washim-Balaji-Mehkar पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून आहेत, पण त्यांनी शंख आणि पद्म धारण करीत आलेल्या सर्व भक्तांना आलिंगन भेट देण्याचे ठरविले आहे. असो...भगवान विष्णू अनंतकोटी ब्रह्मांडाचे सूत्रसंचालक आहेत.
चालविले जाते, ज्याने जनाईचे।
तोचि चालवितो जाते ब्रह्मांडाचे।।
 
 
 
संचालन ही बाब निर्मिती आणि संहारापेक्षा कठीण आहे. संचालनासाठी संतुलन आवश्यक आहे. युद्ध आणि बुद्ध यांचा समन्वय साधावा लागतो. ‘भितर युद्ध नहीं होता तो, भगवान बुद्ध नहीं होते' हे खरंच आहे. Washim-Balaji-Mehkar म्हणून भगवान विष्णूंनी शांतीची प्रतीके कमळ आणि शंख तर शिस्तीची प्रतीके चक्र आणि गदा धारण केले आहेत. बक्षीस आणि शिक्षा याचा विवेक भगवान सूत्रसंचालन करताना वापरतात. Washim-Balaji-Mehkar म्हणूनच आयुधांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण सर्वजण नेहमीच भगवान विष्णू, नारायण, बालाजी मंदिरात जातो. आता हा दृष्टिकोन ठेवून दर्शन घ्या. आयुधे कोणत्या हातात आहेत, हे पाहा. वेगळाच आनंद आणि अनुभूती मिळेल.Washim-Balaji-Mehkar
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले।
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे। पाहता रूप आनंद साठवे।।
९८२२२६२७३५
Powered By Sangraha 9.0