जिपच्या ‘त्या’ 185 शाळांचे होणार समायोजन

22 Apr 2024 09:49:21
गोंदिया, 
ZP schools कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करून, समूह शाळा विकसित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने धोरण अंगीकारले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 185 शाळांचे जवळच्या मोठ्या शाळांमध्ये समायोजन करून, या समूह शाळांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. पाच वर्षात भूजल पातळीत 0.59 मीटरने वाढ
 
 
ZP schools
 
गोंदिया जिल्ह्यातील 1 ते 20 विद्यार्थी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांचे समायोजन करून समूह शाळांच्या धर्तीवर राज्यात समूह शाळा निर्मितीचे प्रस्ताव शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत मागवले होते. योजनेला प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना सक्त आदेश दिले. गोंदिया जिल्ह्यात शाळेच्या यु-डायस 2023-24 च्या स्थितीनुसार व शाळांना वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या भेटीदरम्यान 185 शाळांची पटसंख्या 1 ते 20 असल्याचे निदर्शनास आले. यावर वरिष्ठांनी चिंता व्यक्त करून या शाळांची जवळच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजित केले आहे. तसा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. ZP schools प्रस्ताव पाठवले म्हणजे शाळांचे समायोजन झाले असे नाही. प्रस्तावांची योग्य छाननी करून, अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुर्गम व आदिवासी भागात शक्यतो समायोजन होणार नाही, अशी माहिती आहे. असे असले तरी शिक्षण विभागाच्या या धोरणामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये रोष दिसून येत आहे. गोंदिया तालुक्यातील 22, तिरोडा 14, आमगाव 22, देवरी 41, गोरेगाव 25, सडक अर्जुनी, 18, सालेकसा 26 व अर्जुनी मोरगाव 17 अशा 185 शाळांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे यापैकी 80 पेक्षा अधिक शाळा या 1 शिक्षकी, 90 शाळा 2 शिक्षकी तर 6 शाळांमध्ये तर शिक्षकच नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या पत्रामध्ये उल्लेखित आहे.
  

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासात अडचणी येतात. समूह शाळांचा फायदा विद्यार्थ्यांना एकूणच शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी होणार आहे. समूह शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, या विद्यार्थ्यांना हुशार आणि तंत्रस्नेही शिक्षक मिळण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महामुनी यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0