heat wave शहरासह जिल्ह्यात गेल्या चारपाच दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून पारा वाढतच चालला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली आहे. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तर वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. पाच वर्षात भूजल पातळीत 0.59 मीटरने वाढ
जिल्ह्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्याचा पारा चढू लागला. मात्र अधूनमधून ढगाळ वातावरण व वादळी सरींनी हवेत गारवा निर्माण करीत नागरिकांना दिलासा दिला होता. आता एप्रिल मध्यानंतर उन्हाचा पारा सैराट होत आहे. आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. शुक्रवार, 19 एप्रिल रोजी 41.1 तापमानाची नोंद झाली. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर झाल्याचे दिसून आले. heat wave तर शनिवारी 41.7 तापमान नोंदविले गेले. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. यंदा एप्रिल महिन्यात सूर्याचा पारा 41 अंशापार गेल्याने मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता जिल्हावाशियांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिक आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. जिपच्या ‘त्या’ 185 शाळांचे होणार समायोजन