‘फॅशन डिझायनिंग’मध्ये हिवरासंगमच्या अभिजितची उत्तुंग भरारी

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- गावांसह तालुक्याचे नाव केले मोठे

हिवरासंगम, 
'Fashion Designing' : महागाव तालुक्यातील हिवरासंगम या छोट्याशा गावातून जाऊन गुजरात येथे ‘फॅशन डिझायनिंग’च्या या अभ्यासक‘मात प्रावीण्य मिळवून शेवटच्या वर्षी फॅशन डिझाइनिंगचा ‘बेस्ट डिझायनर ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळवून ग्रामीण भागासह हिवरा, संपूर्ण तालुक्याचे नाव मोठे करणार्‍या अभिजित फाळकेवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिजितचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हिवरा संगम येथेच झाले. दहावीनंतर पॉलिटेक्निक आणि नंतर गुजरात अंकलेश्वर येथील वाणिज्य एवं उद्योग मंत्रालयाच्या फूटवेअर डिजाइन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्युटमध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर स्थान प्राप्त केले.
 
 
y23Apr-Fashion
 
'Fashion Designing' : या संस्थेत वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. यातील फूटवेअर फॅशन डिझाईन हा अभ्यासक‘म निवडून अभिजित हे प्रावीण्य मिळवले. शेवटच्या पदवी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्वतः एक गारमेंट कलेक्शन तयार करायचे असतेे. कलेक्शन फॅशन शोद्वारे दाखवण्यात येते. अभिजित फाळकेचा या शोसाठी ‘प्युरिटी आणि इनोसन्स’ हा विषय होता. त्याने या विषयावर 5 डिझाईन तयार केले आणि फॅशन शोच्या परीक्षकांकडून अव्वल नंबर मिळवला. त्यामुळे त्याला यावर्षीचा ‘बेस्ट डिझायनर ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. यासाठी त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे, आपल्या यशाचे श्रेय तो वडील भगवान फाळके व आईला देतो.