पाच दिवसांपासून बीएसएनएलचे ब्रॉडबँड बंद

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
पुसद, 
BSNL broadband off : पाच दिवसांपासून बीएसएनएलची वायफाय सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणीचे होत आहे. इतके दिवस ही सुविधा बंद असूनही त्यांचा अधिकृत प्रतिनिधी कोणत्याही ग्राहकाचा फोन उचलत नाही. तर बीएसएनएलकडूनही ग्राहकांना थातुरमातूर उत्तर मिळत आहे.
 
 
BSNL
 
BSNL broadband off : या प्रकरणी अनेकांनी दूरसंचारच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रारीदेखील दिल्या आहेत. मात्र यावर काहीही उपाय गेल्या पाच दिवसात झालेला नाही. यामुळे असंख्य अडचणींना बीएसएनएल ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाइन ऑफिसेसमुळे संबंधितांना तर वायफाय नसल्यामुळे अनेकांचे मोबाईल आणि टीव्हीदेखील बंद आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुसरी बाजू म्हणजे, बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळेच खाजगी कंपन्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. खाजगी कंपन्या त्वरित अडचणींचे निवारण करतात. मात्र बीएसएनएलकडून अशी कसलीही उपाययोजना गेल्या पाच दिवसांत झालेली नाही.
 
 
 
BSNL broadband off : दर पंधरा दिवसांनी अशी तीन-तीन, चार-चार दिवस ही सेवा बंद असते. एक एजंट हे काम करतो, तो कोणाचेही फोन उचलत नाही, तो कोणालाही कोणताही प्रतिसादच देत नाही. कित्येक तक्रारी करूनही काहीही उपयोग कधीही झालेला नाही. याबाबत बीएसएनएलकडून कळले की, खाजगी लोकांना काम दिल्यामुळे काम फास्ट होईल ही भावना ठेवून सरकारने ही कामे खाजगी एजंटांना दिली, पण सरकारचाही भ्रमनिरास झाला. एजंट आणि शासन दोन्हीकडून ग्राहकांची कोंडी होते आणि ग्राहकांना तोंड मात्र त्यांनाच द्यावे लागते. मात्र यामुळे होणार्‍या नुकसानाला कोण जबाबदार याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे, अन्यथा खाजगी कंपन्यांकडचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढला जाईल आणि शासनाचे नुकसान होईल.