कीटकनाशक उत्पादकांच्या मुसक्या आवळणार

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- कृषी गुणनियंत्रण संचालकांचा आदेश

यवतमाळ, 
Pesticide packing : कीटकनाशकांच्या पॅकिंगमध्ये आतील बाजूस देण्यात येणार्‍या माहितीपत्रकावरील अक्षरांचा आकार हा वाचनीय नसतो. त्यातून शेतकर्‍यांच्या फसवणुकीची शक्यता लक्षात घेऊन राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी यासंबंधी पडताळणीचे आदेश दिले आहेत. कीटकनाशक संदर्भातील तांत्रिक माहिती, विषबाधा झाल्यास करावयाच्या उपाययोजना, त्याचे पाण्यातील प्रमाण किती असावे, याची माहिती Pesticide packing कीटकनाशक पॅकिंगच्या आत एका छोट्याशा कागदावर दिली असते. अनेक भाषांमध्ये असलेली ही माहिती अगदी लहान आकाराच्या कागदावर असल्यामुळे त्यावरील अक्षरांचाही आकार खूपच बारीक असतो.  ‘फॅशन डिझायनिंग’मध्ये हिवरासंगमच्या अभिजितची उत्तुंग भरारी
   
 
y23Apr-label
 
त्यामुळे ही माहिती वाचताच येत नाही आणि या माहितीचा कोणताच उपयोग शेतकर्‍यांना होत नाही. यामुळे कृषी केंद्रवाला जसे सांगेल किंवा जसे कळेल तशी फवारणी तो करतो आणि त्यातूच फवारणी करणार्‍यांचे हवेतून विषबाधा होऊन जीव जातात. शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी हा मुद्दा मांडला. त्याची दखल घेत निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकार्‍यांना कीटकनाशके माहितीपत्रक तपासण्याचे आदेश दिले आहेत. कीटकनाशक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास त्या कीटकनाशक उत्पादकाच्या परवान्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचेही या पत्रात नमूद आहे.
अक्षरे वाचनीय असावी
Pesticide packing : या माहितीपत्रकावर इंग्रजी, स्थानिक व राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी असावी. त्याचा फाँट साइज 8 पॉईंट असावा, असे केंद्राच्या धोरणात आहे. त्यानुसार राज्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे मी पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेत हे आदेश दिले आहेत, असे शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले यांनी सांगितले. हा प्रश्न केंद्र व राज्य सरकारांकडे लावून धरण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार भावना गवळी, खासदार नवनीत राणा व आमदार मदन येरावार यांनी पाठपुरावा केला, असेही ते म्हणाले.  पाच दिवसांपासून बीएसएनएलचे ब्रॉडबँड बंद