महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

28 Apr 2024 12:01:36
पुणे,
Maharashtra weather महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले असून, दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या शिडकाव्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
 
विराट कोहलीसाठी खतरा बनला संजू सॅमसन 
Maharashtra weather
 
स्मृती इराणी नामांकनापूर्वी घेणार राम लल्लाचे दर्शन  दरम्यान, आता हवामान विभागाने पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागांत वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली असून, काही भागांत उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.  हवामान विभागाने पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. Maharashtra weather या काळात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दुसरीकडे, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत रविवारी  विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाजही वर्तविला आहे.  जल तत्व दर्शवणारे महादेव जम्बुकेश्वर मंदिर
सोमवारी मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. त्याचबरोबर मंगळवारीही मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0