जोरदार वादळामुळे कारवर पडले झाड...

30 Apr 2024 17:13:36
  
zad
 
नागपूर, 
Shaktimata Nagarमंगळवार, दि. 30 एप्रिलला पहाटे आलेल्या जोरदार वादळामुळे शक्तिमाता नगर गल्ली नंबर 5, मध्ये राहणाऱ्या दिपक रेवतकर यांच्या घराजवळचे झाड तुटून कारवर पडले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मध्यरात्रीनंतर नागपुरात जोरदार वादळी वारे वाहू लागले. एवढेच नव्हे तर विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊ लागला. या वादळी वार्‍यांमुळे शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. काही झाडांचा फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. शक्तिमाता नगर येथीही रेवतकर यांच्या घराजवळ एक झाड उन्मळून कारवर पडले. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
सौजन्य: दिपक रेवतकर,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0