उद्या पांढरकवडा येथे नितीन गडकरी यांची जाहीर सभा

05 Apr 2024 20:21:12
- मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

पांढरकवडा, 
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवार, 6 एप्रिल रोजी पांढरकवडा दुपारी 1 वाजता केंद्रीय मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
 
 
nitin ji
 
देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र विकास कामांचा तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा धडाका लावून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रचार दौरे आणि सभांमधून त्यांच्या कामावर नागरिकही समाधान व्यक्त करून समर्थन देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळावी तसेच जिल्ह्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास यावेत, याकरिता विकासाला अर्थात सुधीर मुनगंटीवार यांना साथ देण्याचे आवाहन समर्थकांकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0