तभा वृत्तसेवा
हिंगोली,
Election Officer Jitendra Papalkar हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसर्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीवर विशेष भर दिल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी मतदारांमध्ये मतदानासंबंधी जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पथकप्रमुख संदीप सोनटक्के, प्रशांत दिग्रसकर मतदारांना साक्षर करण्यासाठी उपक‘म राबवित आहेत.

उद्या पांढरकवडा येथे नितीन गडकरी यांची जाहीर सभा
मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातही विविध होर्डिग्ज, बॅनर, पोस्टर्स, स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना आई-वडिलांनी मतदान करण्यासाठी आवर्जून जावे, यासाठी संकल्प पत्राचेही वितरण करण्यात आले आहे. मी मतदार, मतदार स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातूनही मतदारसंघात ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
Election Officer Jitendra Papalkar जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रशासनाकडून विविध होर्डिग्ज लावण्यात येत आहेत. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा’ असे फलकावर मतदारांनी स्वाक्षरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीबद्दल वर्षभर विविध उपक‘म राबविण्यात येत असून, हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सांगितले.
‘अहंकार’ : स्त्री शक्ती व सामाजिक समानता जपणारा चित्रपट