हिंगोली लोकसभेत 48 अर्ज वैध

06 Apr 2024 19:36:42
- विश्वनाथ फाळेगावकर पहिले तृतीयपंथी उमेदवार

हिंगोली, 
Hingoli Lok Sabha constituency : हिंगोली लोकसभा मतदारसंघात 55 उमेदवारांनी एकूण 78 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शुक‘वार, 5 एप्रिलला छानणीअंती 55 उमेदवारांपैकी 7 जणांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात 48 अर्ज वैध ठरले आहेत. सोमवार, 8 एप्रिल ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असून या दिवशी मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी होणार्‍या निवडणुकीची अर्ज छाननी प्रकि‘या पार पडली.
 
 
y6Apr-Vishnath-Falegavkar
 
Hingoli Lok Sabha constituency : यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह या कामी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हेमंत पाटील, बहुजन समाज पार्टीचे वसंत पाईकराव, बहुजन समाज पक्षाचे विजय बलखंडे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. माकपचे शंकर सिडाम, अपक्ष गजानन घोंगडे उत्तम धाबे व सरोज नंदकिशोर देशमुख यांचेही अर्ज अवैध ठरले असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
पहिल्यांदाच तृतीयपंथीचा अर्ज
हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराने अपक्ष म्हणून नामनिर्देशन दाखल केले असून, त्यांचा अर्ज छाननीअंती वैध ठरला आहे. नामनिर्देशनपत्र वितरण व स्वीकृतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत 55 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरले आहेत.
Powered By Sangraha 9.0