अमरावती लोकसभेच्या रिंगणात 37 उमेदवार

तिरंगी लढत होणार, 19 उमेदवारांची माघार

    दिनांक :09-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Amravati Lok Sabha अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतून 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता 37 उमेदवार रिंगणात राहीले आहे. सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी माहिती दिली. या मतदारसंघात भाजपाच्या नवनीत राणा, काँग्रेसचे आ. बळवंत वानखडे, प्रहारचे दिनेश बुब यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
 
 
Amravati Lok Sabha
 
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते. Amravati Lok Sabha निवडणुकीच्या रिंगणातल्या उमेदवारांमध्ये नवनीत राणा(भाजपा-कमळ), बळवंत वानखडे(काँग्रेस-पंजा), संजयकुमार गाडगे (बसपा-हत्ती), इंजी. अविनाश धनवटे(पिपाइंडे- फळांची टोपली), आनंदराज आंबेडकर(रिपब्लिकन सेना- गॅस सिलेंडर), गणेश रामटेके (अभापपा-किटली), गाजी सादोद्दीन जहिर अहमद (राओकौं-ऑटो रिक्षा), दिगांबर भगत(नभाएपा-स्पॅनर), दिनेश गणेशराव बुब (प्रहार-शिट्टी), नरेंद्र कठाने(देजपा-शाळेचे दप्तर), भाऊराव वानखडे (ऑइंफॉब्लॉ-सिंह), राजु कलाने (बभापा-जहाज), सुषमा अवचार (जविपा-रुम कुलर), अपक्ष उमेदवारांमध्ये अनिल ठवरे ऊर्फ अनिलकुमार नाग बौद्ध, अरुण भगत, किशोर लबडे, किशोर तायडे, गौतम उर्फ अनंता इंगळे, तारा वानखडे, प्रभाकर भटकर, प्रमोद चौरपगार, पृथ्वीसम्राट दिपवंश, भरत यांगड, मनोहर कृष्णाजी कुर्‍हाडे, मानकर ज्ञानेश्वर, रवी वानखडे, राजु सोनोने, राजेश खडे, वर्षा भगत, श्रीकृष्ण क्षिरसागर, सतिश गेडाम, सुमित्रा गायकवाड सुरज नागदवने, सुरेश मेश्राम, सोनाली मेश्राम, संदिप मेश्राम, हिम्मत भिमराव ढोले यांचा समावेश आहे.