अकोला लोकसभा मतदार संघात होणार पारंपरिक तिरंगी लढत

09 Apr 2024 20:14:01
अकोला,
Akola Lok Sabha Constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दाखल करण्यात आलेल्या 17 उमेदवारी अर्जांपैकी दोन उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत.त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 15 उमेदवार उरले आहेत.हे सर्व पाहता आता पारंपरिक तिरंगी लढत येथे होणार आहे.
 
 
ASF
 
 
निवडणूकीसाठी दाखल 17 अर्जांपैकी नारायण हरिभाऊ गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) असे दोन अर्ज आज मागे घेण्यात आले. आता यातील उर्वरित 15 उमेदवारांना चिन्हवाटपासाठी बैठक निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात झाली. बैठकीला उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, विशेष सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.
 
 
बैठकीत सिलेंडर या चिन्हाची मागणी प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आल्याने ‘ड्रॉ’ काढण्यात आला. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. प्रकाश यशवंत आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले.
 
 
उर्वरित उमेदवारांचे पक्ष व चिन्हे पुढीलप्रमाणे : अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी, कमळ), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंजा), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी, टीव्ही), मुरलीधर पवार (अपक्ष, फलंदाज), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष, जहाज), धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष, एअर कंडिशनर), अशोक किसन थोरात (अपक्ष, रोडरोलर), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष, हिरा), ड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऊस घेतलेला शेतकरी). प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सोशल, चिन्ह- गॅस शेग़डी), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी, रूम कुलर), दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष, नारळाची बाग).असे चिन्ह वाटप उमेदवारांना करण्यात आले आहे. चिन्हवाटपानंतर सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व नियम आदी माहिती व साहित्य देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0