गोंदिया रेल्वेस्थानक ‘सौरउर्जा’ वान

    दिनांक :09-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
Gondia Railway Station : रेल्वेस्थानकाच्या आधुनिकरणासोबतच नियमीत खर्चात बचत करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सौरउर्जे निर्मिती करुन वीजपुरवठा हा प्रयोग राबविण्यात येत आहे. यातंर्गत गोंदिया रेल्वेस्थानकावर सध्या 270 केव्ही सौरउर्जा निर्मिती तयार केली जात असून स्थानक सौरउर्जावान झाले आहे.
 
 
Gondia Railway Station
 
रेल्वेस्थानकावर वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून विभागाला मोठ्या रकमेचा भरणा वीज कंपनींना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेस्थानकावर सौरउर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला. यातंर्गत गोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. 3 ते 6 वर सौरउर्जा निर्मितीसाठी 884 सौर पॅनल लावले आहेत. एक पॅनलमधून 325 व्हॅट सौर उर्जा निर्मिती केली जात असून यासाठी स्पार्ट इन्वर्टर लावण्यात आले आहे. सौरउर्जापासून तयार वीज प्रथम इन्व्हर्टरला पुरवठा केली जाते. यासाठी 50 केव्हीचे 5 व 20 केव्हीचे 1 इन्व्हर्टर लावण्यात आले आहे. तसेच ठिकाणाहून वीजपुरवठा करण्यासाठी पॅनलद्वारे स्थानकाला वीजपुरवठा केला जातो. स्थानकाला 350 केव्ही वीजेची गरज असून 270 केव्ही वीज निर्मिती सौरउर्जेपासून केली जात असून त्याची टक्केवारी 90 आहे. विशेष म्हणजे, या रेल्वेस्थानकाला पीट लाईन परिसरातील 4 सबस्टेशनवरुन वीजपुरवठा केला जात आहे. मात्र आता चारही सबस्टेशनवर सौरउर्जेपासून निर्मित वीज रेल्वेस्थानकावर पुरवठ्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने महावितरणकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल्वेस्थानकावरील महावितरणचे वीज मीटर काढून त्याठिकाणी सौरउर्जा मीटर लावण्यात येणार आहे.
 
 
प्रकल्पासाठी खर्च नाही..
 
 
सौरउर्जा प्रकल्पासाठी रेल्वे विभगााला कुठलाही खर्च आलेला नाही. एका कंपनीने रेल्वेला हा प्रकल्प लावून दिला. रेल्वे विभागाने केवळ जागा उपलब्ध करुन दिली. या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीचे कामही सदर कंपनीच करणार असल्याची माहिती आहे.