वेद सोळंकेला मर्सिडीझ-बेन्झ फेलोशिप

‘ग्लोबल राईज विनर’ च्या यादीत ही अव्वल

    दिनांक :11-May-2024
Total Views |
वाशीम,
Mercedes-Benz Fellowship : वाशीम येथील नागठाणा गावच्या १७ वर्षीय वेद सोळंकेची नुकतीच मर्सिडीझ-बेन्झ फेलोशिप करिता निवड करण्यात आली. या अंतर्गत वेद आगामी काळात समाजहितार्थ प्रकल्प राबविण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात काम करेल. ह्या फेलोशिप अंतर्गत त्याला प्रादेशिक शिखर परिषदे मध्ये सहभागी होता येईल ज्यात भारतातील बैगलोर, साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, उत्तर अमेरिकेतील मेसिको आणि जर्मनीतील बर्लिन येथे होणार्‍या शिखर परिषदांचा समावेष आहे.अत्यंत कठीण स्पर्धेततून जगभरातील अव्वल दूरदर्शी युवकांची निवड केली जाते यात वेदचा समावेश असणे हि विदर्भासाठी गौरवाची बाब होय.
 
 
ved
 
वेद सोळंके या युवकाने शालेय परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पुढील अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्र न निवडता ‘मानवतेचा अभ्यास’ (ह्युमॅनिटी स्टडीज) क्षेत्राला प्राधान्य दिले. त्या करिता संभाजीनगर येथे तो नाथ व्हॅली शाळेत इयत्ता अकरावीत शिकत आहे. वेदच्या संवाद कौशल्य, नाविन्यपूर्ण कल्पना, राज्यशास्त्र अभ्यास, वादविवादात रुची आणि लीडरशिपच्या बळावर त्याने वर्ल्ड फूड फोरम फायनॅलिस्ट, बिल अँड मेलिंडा गेट्स व हंड्रेडचा युथ अँबॅसेडर प्रोग्रॅम, दुबईतील कोप-२८ परिषदेत सादरीकरण, संयुक्त राष्ट्र मुख्यालयी विचार मांडणे तसेच अलीकडे पॉप मुव्हमेंट कडून दिला जाणारा शाश्वतता नवोपक्रम आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला. उल्लेखनीय हे कि आतंरराष्ट्रीय राईज च्या अंतिम १०० प्रभावी युवकांच्या स्पर्धेसाठी लाखो अर्जदारांमधून त्याची प्रथम ५०० युवकांमध्ये निवड झाली आहे आणि ८ जून २०२४ रोजी तो मुलाखत देणार. वेदच्या बहुआयामी व्यक्तित्वात मर्सिडीझ-बेन्झ फेलोशिप ने आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे.