शंभुराजे-समर्थ योग !

13 May 2024 04:57:42
वेध
- अनिरुद्ध पांडे
 
Maratha-Chava-Sambhaji छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा १४ मे १६५७ हा जन्मदिवस. शिवाजी महाराजांच्या महाराणी सईबाई यांच्या पोटी शंभुराजांचा जन्म झाला. Maratha-Chava-Sambhaji पण शंभुराजे सव्वादोन वर्षांचे असतानाच, म्हणजे ५ सप्टेंबर १६५९ रोजी एका जीवघेण्या आजारात त्या स्वर्गवासी झाल्या. बाळ शंभुराजांचा सांभाळ त्यानंतर मुख्यत्वेकरून आजी जिजाऊ मांसाहेबांसह सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई आणि लक्ष्मीबाई या शिवरायांच्या इतर राण्यांनी म्हणजेच शंभुबाळाच्या सावत्र आईंनी केला. Maratha-Chava-Sambhaji छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे संभाजी हे युवराज होते. लहानपणापासून देखणे, राजबिंडे, धाडसी, शूर, शस्त्रपारंगत आणि तितकेच विद्वान असलेले संभाजीराजे व्रात्य, खोडकर आणि तापटही होते. Maratha-Chava-Sambhaji बाल संभाजी त्यांच्या स्वभावानुसार दहाव्या-बाराव्या वर्षांपासूनच जंगलात शिकारीला जात. असेच एकदा शिकारीला गेले असताना वाघाला युवराजांकडे आणण्यासाठी हाकाटी केल्या गेली. त्यावेळी बंदूक, भाला, धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांनी तलवारीने वाघाची शिकार करायचे ठरवले. सोबतच्यांनी त्यांना खूप समजावले. पण जिद्दीच्या युवराजांनी ते ऐकले नाही.
 
 
 
Maratha-Chava-Sambhaji
 
 
Maratha-Chava-Sambhaji धावून आलेल्या दांडग्या वाघाने थेट शंभुराजांच्या अंगावर झेप घेतली. शंभुराजांनी त्या वाघाला अंगावर घेऊन तलवारीने भोसकले. वाघ तर मेला व पण झटापटीत राजे जखमी झाले. सईबाई मांसाहेब गेल्यामुळे संभाजी जरा बेलगाम झाले होते. त्यातून धाडसी स्वभाव, अशा घटना होत असत. वाघाच्या शिकारीनंतर जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या संवादात ‘शंभुबाळ' असा उल्लेख केल्याचे सांगतात. Maratha-Chava-Sambhaji इतके लहान होते युवराज संभाजी. त्यावेळी महाराज जिजामातेला म्हणाले, ‘मांसाहेब, तुम्ही ज्या कडक शिस्तीत आम्हाला वाढवले, ती शिस्त शंभुबाळांना मात्र नाही. तुम्ही त्यांना लाडावून ठेवले आहे.' त्यावर जिजामाता उत्तर देतात, ‘शिवबा तुमची चूक होते आहे. हा प्रश्न आम्ही शंभुबाळाची आई सईला विचारला असता. तुम्हाला आई आहे, त्यांना नाही.' त्यावेळच्या युवराज संभाजींचे वर्णन करताना इतिहासकार लिहितात, Maratha-Chava-Sambhaji १५ वर्षांचे संभाजी राजे. मानेवर पडलेले, मागे परतविलेले काळेभोर केस, विशाल तेजस्वी नेम, कर्र्पूरगौर रंग आणि भरदार तणावलेली छाती असे देखणे त्यांचे रूप होते. या १५ वर्षीय शंभुराजांचे त्यावेळी येसुबाईंशी लग्नही झाले होते.
 
 
 
पण त्यांच्या बंडखोर आणि आक्रमक स्वभावाला थोडे वळण मिळावे म्हणून छत्रपती शिवाजी आणि जिजाऊ मांसाहेबांनी समर्थ रामदास स्वामींची शंभुराजांशी भेट घालून देण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने समर्थांच्या शिवथरघळ या आश्रम परिसरात छत्रपती आणि युवराज दोघेही पोहोचलेत. तेव्हा समर्थ व्याघ्रासनावर विराजमान होते. ज्ञानासोबतच शक्तीचीही उपासना गरजेचीच आहे, हे सांगणाऱ्या रामदास स्वामींच्या मागे भिंतीवर धनुष्य आणि बाणांचा भाता अडकवला होता. Maratha-Chava-Sambhaji युवराज शंभुराजांचे लक्ष त्या शस्त्रांवर खिळले आणि साधूला शस्त्रांचे काय काम हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. त्यावर समर्थांनी सांगितले, शस्त्रसज्ज असायलाच हवे आहे. आम्हाला वन्यप्राण्यांइतकीच मोगली अत्याचारांची भीती बाळगावीच लागते. हे सांगताना रामदासांनी आपली कुबडी हातात घेऊन त्यातील दीड हात लांबीचे धारदार पातेही युवराजांना काढून दाखवले.
 
 
 
Maratha-Chava-Sambhaji समर्थ रामदासांनी शिवाजी आणि संभाजी या दोन्ही छत्रपतींना निक्षून सांगितले, ‘दुबळ्यांच्या दशेला आणि दीनांच्या अहिंसेला फारसा अर्थ नसतो. हे दोन्ही गुण सिद्ध व्हायला सामर्थ्यवान बनावेच लागते.' पुढे समर्थांनी वेळोवेळी छत्रपती आणि शंभुरायांशीही त्यांना वेळोवेळी ‘युक्तीच्या चार गोष्टी' सांगितल्या. शिवाजी महाराजांनंतर समर्थांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये संभाजीराजांना या शब्दांत सांगितली,
शिवरायांस आठवावे । जीवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे । कीर्तिरूपे ।।Maratha-Chava-Sambhaji
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।।
शिवरायांचे कैसे चालणें । शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांची सलगी देणे । कैसे असे ।।Maratha-Chava-Sambhaji
 
 
 
शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतानाच समर्थ रामदास स्वामी छत्रपती संभाजी महाराजांना राज्य कारभारातील काही बारीक गोष्टीही काव्यरूपात पत्र लिहून सांगतात त्या अशा, Maratha-Chava-Sambhaji
सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजविजा करत बैसावे । येकान्त स्थळी ।।
कांही उग्रस्थिती सांडावी । कांही सौम्यता धरावी ।
qचता लागावी परावी । अंतर्यामी ।।
मागील अपराध क्षमावे । कारभारी हाती धरावे । Maratha-Chava-Sambhaji
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ।।
समय प्रसंग वोळखावा । राग निपटून काढावा ।
आला तरी कळू नेदावा । जनांमध्ये ।।
९८८१७१७८२९
Powered By Sangraha 9.0