निवृत्त सैनिकाचा तिघांवर गोळीबार

13 May 2024 14:21:18

chalabe
 
ग्वाल्हेर,
Retired soldier firing मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका निवृत्त जवानाने तिघांवर गोळ्या झाडल्या. ग्वाल्हेरच्या महाराजपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील रसूलपूरमध्ये ही घटना घडली आहे. गोळी लागल्याने दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या तारा लावण्यावरून वाद झाला, त्यानंतर हा वाद इतका वाढला की, आरोपींनी तीन जणांवर गोळ्या झाडल्या. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास महाराजपुरा पोलीस करत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्यामध्ये दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  गडचिरोलीत 3 नक्षल्यांचा खात्मा
 
Powered By Sangraha 9.0