देशविरोधी बडबड !

13 May 2024 05:03:41
कानोसा 
 
- अमोल पुसदकर
 
 
 
Sam Pitroda-Congress सध्या सॅम पित्रोदा हे नाव खूप चर्चेत आहे. हे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष काल-परवापर्यंत होते. त्यांनी भारतातील लोकांच्या रंगावरून त्यांचे विदेशी संबंध शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, उत्तर भारतातील लोक हे गोऱ्या इंग्रजांप्रमाणे आहेत, तर पश्चिम भारतातील लोक हे अरबी लोकांसारखे आहेत. Sam Pitroda-Congress दक्षिण भारतातील लोक हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत व पूर्व भारतातील लोक हे चिनी लोकांसारखे आहेत. म्हणजे त्यांना हे म्हणायचे आहे की, इथे मूळ भारतीय कोणीच नाही. जे कोणी आहेत ते विदेशातून स्थलांतरित होऊन आलेले किंवा त्यांचे वंशज असे हे लोक आहेत. Sam Pitroda-Congress सॅम पित्रोदा हे ज्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष होते; ही काँग्रेस म्हणजे भारतातल्या काँग्रेसची बहीण आहे. ही विदेशात काम करणारी काँग्रेस आहे. सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे राजकीय गुरू आहेत. मनमोहन सिंग सरकारमध्ये हे मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते व त्याही आधी राजीव गांधींसोबत यांनी काम केलेले आहे. Sam Pitroda-Congress त्यामुळे गांधी घराण्याचा, त्यांच्या विचारधारेचा व यांचा जुना संबंध आहे. हे लोक म्हणजे काँग्रेस ज्या विचारांचे वाहक आहे तो विचार म्हणतो की, हा देश कधीच नव्हता.Sam Pitroda-Congress 
 
 
Sam Pitroda-Congress
 
‘लोक आते गये और कारवाँ बनता गया... म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक या देशात आले व येथे स्थायिक झाले. असे करता करता हा देश बनला. सॅम पित्रोदा हे यापूर्वी वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेले आहेत. Sam Pitroda-Congress काही दिवसांपूर्वीच ते म्हणाले होते की, जसा अमेरिकेमध्ये वारसा कर लागतो; ज्यामध्ये एखादा करोडपती माणूस जर मरण पावला तर त्याची ५५ टक्के संपत्ती सरकार जप्त करते व केवळ ४५ टक्के संपत्ती ही तो आपल्या मुलांना वाटून देऊ शकतो; तशाच पद्धतीचा कर हा भारतातही असावा. २०१९ मध्ये ते म्हणाले होते की, मध्यमवर्गीय लोकांनी स्वार्थी बनू नये. त्यांनी अधिक कर भरण्यासाठी आपली कंबर कसली पाहिजे. Sam Pitroda-Congress वास्तविक पाहता मध्यमवर्गीय लोक हे कर भरण्याच्या बाबतीत अधिक पापभिरू असतात व सर्वाधिक मध्यमवर्गीय लोक कर भरतात. शीख विरोधी दंग्यांच्या बाबतीत ते म्हणाले होते की, शिखांची हत्या झाली तर झाली; जे झालं ते घडून गेलं. म्हणजे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील एवढ्या मोठ्या शिखांच्या झालेल्या नरसंहाराबद्दल काँग्रेसच्या या राजकीय गुरूला काहीही दुःख नाही. पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याबद्दल ते म्हणाले होते की, असे हल्ले तर होतच राहतात; परंतु बालाकोटची एअर स्ट्राईक करून तुम्ही अतिरेक्यांनी जे कृत्य केलेले आहे त्याची शिक्षा संपूर्ण पाकिस्तानला का देत आहात?Sam Pitroda-Congress
 
 
 
संपूर्ण भारताला नव्हे, जगाला माहीत आहे की, दहशतवादाचे प्रशिक्षण केंद्र पाकिस्तान आहे. भारतामध्ये चालणारा दहशतवाद हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आहे. असे असताना पुलवामांमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांबद्दल एक शब्दही न बोलता बालाकोटमध्ये अतिरेकी मारले गेले त्यावर दुःख व्यक्त करणे, पाकिस्तानच्या नुकसानाबद्दल दुःख व्यक्त करणे ही यांची देशभक्ती आहे का? Sam Pitroda-Congress राम मंदिरासंदर्भात बोलताना ते म्हणाले होते की, राम मंदिर बनल्याने लोकांना रोजगार मिळणार आहे का? राम मंदिर जेव्हा नव्हते तेव्हा रोजगार होता का? हे पण सॅम पित्रोदांनी सांगायला पाहिजे किंवा  काँग्रेसने सांगायला पाहिजे. राम मंदिर हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे, हा रोजगाराचा विषय नाही. बाबरी मशिदीसाठी अयोध्येमध्ये वेगळी जागा देण्यात आलेली आहे; ती मशीद आता तेथे बनल्याने भारतातला रोजगार वाढणार आहे का? यावर मात्र काँग्रेस किंवा त्यांचे राजकीय गुरू सॅम पित्रोदा काही बोलत नाहीत. Sam Pitroda-Congress वास्तविक, यांचे बोलविते धनी वेगळेच असतात. काँग्रेस ही एक विचारधारा आहे; ज्या विचारधारेने भारताला कधीही एक राष्ट्र मानले नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून भारत म्हणजे वेगवेगळ्या जातिपंथांचा एक समूह होता. त्यांच्यासाठी भारत, भारतमाता कधी होती का? हाच प्रश्न आहे.
 
 
 
बरेचदा लोक स्वातंत्र्यासाठी ज्या काँग्रेसने काम केले ती काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये गल्लत करतात. स्वातंत्र्याच्या काळामध्ये असलेली काँग्रेस हे एक स्वातंत्र्याचे आंदोलन होते; ते समाप्त झाले. Sam Pitroda-Congress त्यानंतर त्याच नावाचा एक राजकीय पक्ष सुरू झाला. जसा राहुल गांधींचा महात्मा गांधींशी काहीही संबंध नाही तसेच स्वातंत्र्यासाठी काम करणारे लोक व त्यांचे आंदोलन असलेली काँग्रेसचा आजच्या काँग्रेस पार्टीशी काहीही संबंध नाही. फक्त दोघांचे नाव सारखे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सॅम पित्रोदा जे म्हणाले व त्यांनी भारतातील लोकांचा विदेशाशी असलेला संबंध अधोरेखित केला. ही सर्व जुनीच भाषा आहे. आर्य भारताच्या बाहेरून आले होते. त्यांनी इथल्या मूळनिवासी लोकांना गुलाम केले किंवा त्यांना पलायन करायला भाग पाडले, अशा पद्धतीचा खोटा प्रचार करण्यात येतो. Sam Pitroda-Congress वास्तविक पाहता जे संशोधन झालेले आहे, त्यामध्ये काही वर्षांपूर्वी हरयाणातील राखीमढी या गावांमध्ये जे ४० मानवी सांगाडे सापडले त्यातील एका सांगाड्याचा डीएनए हा भारतातील २५०० लोकांशी मिळविला गेला तसेच तो युरोप, आफ्रिका आणि इतर देशांमध्ये तेथील लोकांसोबत तपासला गेला; त्यावेळेस असे लक्षात आले की, विदेशी लोकांशी तो डीएनए जुळत नव्हता. परंतु भारतात राहणाऱ्या या लोकांशी मात्र तो जुळला.
 
 
 
हे जे सांगाडे सापडले यांचे आयुष्य ४००० वर्षांपेक्षा जास्त आहे. यावरून आर्य विदेशातून भारतात आले होते, ही अतिशय खोटी व चुकीची माहिती लोकांमध्ये पसरविली गेली. हे एक कथानक आहे जे लोकांना सांगण्यात आले. अनेक विद्वानांनी अशाच पद्धतीचे दावे केले. परंतु, त्या दाव्यांना सिद्ध करणारे पुरावे कोणीही देऊ शकले नाही. Sam Pitroda-Congress संस्कृतमध्ये ‘आर्य' या शब्दाचा अर्थ ‘श्रेष्ठ' असा होतो. त्यामुळे ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्' म्हणजे आम्हाला संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ बनवायचे आहे, अशा पद्धतीची घोषणा आमच्या धर्मग्रंथात आढळून येते. ज्या हरयाणातील राखीमढी येथे हे सांगाडे सापडले, त्याच हरयाणात ५००० वर्षांपूर्वी महाभारताचे युद्ध झाले होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारताला भारत माता मानणाऱ्यांचे सरकार येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणायचे की ज्यांचे प्रेरणा केंद्र इटली, रोम, अमेरिका, युरोप आहे अशांचे सरकार आणायचे, याचा निर्णय जनता निश्चितच करेल. तोपर्यंत ही बडबड ऐकून घ्यावी लागेल.
Powered By Sangraha 9.0