गुजरात टायटन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

14 May 2024 10:46:49
मुंबई,  
Gujarat Titans अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे आयपीएल 2024 चा 63 वा सामना रद्द करण्यात आला आहे. पावसाने गुजरात टायटन्सच्या आशा धुळीस मिळवल्या असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आयपीएलमधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जही बाहेर गेले आहेत. सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता आणि गुजरातला प्रत्येकी एक गुण मिळाला. प्लेऑफच्या समीकरणात कायम राहण्यासाठी गुजरातला दोन गुणांची गरज होती, मात्र आता सामना रद्द झाल्यामुळे हा संघ समीकरणातून बाहेर पडला आहे.
 
Gujarat Titans
 
गुजरातचे सध्या 13 सामन्यांत 11 गुण आहेत आणि संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. गुजरात संघाने तो सामना जिंकला तरी तो जास्तीत जास्त १३ गुणांचा टप्पा गाठू शकेल. सध्याच्या गुणतालिकेत, आधीच चार संघांचे 14 किंवा त्याहून अधिक गुण आहेत. अशा परिस्थितीत जीटी संघ बाहेर आहे. Gujarat Titans पावसामुळे रद्द झालेला या आयपीएलचा हा पहिलाच सामना आहे. कोलकाता संघ आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. एका गुणासह त्याचे 13 सामन्यांत 19 गुण झाले आहेत. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्पर्धा सहा संघांमध्ये आहे. अजूनही तीन जागा रिक्त आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे स्पर्धेतील संघ आहेत.
पावसामुळे खेळपट्टी सुरुवातीपासूनच झाकलेली होती. सकाळी 10.20 वाजता खेळपट्टीवरून कव्हर्स काढण्यात आल्यावर उभय संघांमध्ये पाच षटकांचा सामना होऊ शकतो असे वाटले. मात्र, यावेळी मैदानावरील कर्मचाऱ्यांनी मैदान कोरडे करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे सकाळी 10.36 वाजता गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याशी बोलून दोन्ही पंचांनी सामना रद्द झाल्याचे घोषित केले.
Powered By Sangraha 9.0