मुंबई,
LokSabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडले. 11 मतदारसंघात सुमारे 59.64 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
LokSabha Elections : यावेळी बीड मतदारसंघात सर्वाधिक 69.74 टक्के मतदानाची नोंद झाली असून, पुणे मतदारसंघात 51.25 टक्के सर्वांत कमी मतदान झाले. राज्यातील पहिल्या तीन टप्प्यांतील मतदानापेक्षा चौथ्या टप्प्यातील मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीवरून लक्षात येते.
मतदानाची टक्केवारी
नंदुरबार - 67.12 टक्के
जळगाव - 53.65 टक्के
रावेर - 61.36 टक्के
जालना - 68.30 टक्के
छ. संभाजीनगर - 60.73 टक्के
मावळ - 52.90 टक्के
पुणे - 51.25 टक्के
शिरूर - 51.46 टक्के
अहमदनगर - 62.76 टक्के
शिर्डी - 61.13 टक्के
बीड - 69.74 टक्के