आंतरजिल्हा बदलीतील गुरुजींना लागला ‘ब्रेक’

15 May 2024 20:15:23
- पदे झाली अतिरिक्त

यवतमाळ, 
Zip Yavatmal-Teacher : शासनामार्फत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात प्रवर्गाची पदे अतिरिक्त आहे. परिणामी आंतरजिल्हा शिक्षकांना रुजू करु घेता येणार नसल्याने सध्यातरी जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून येणार्‍या शिक्षकांना ब्रेक लागला आहे. शासनाने 2022-23 आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवली. मात्र, यवतमाळ जिल्हयाची प्रवर्गाची पदे अतिरिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात परत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळातही अनधिकृत ‘होर्डिंग्ज’
 
 
y15May-Z-P-Yavatmal
 
Zip Yavatmal-Teacher : या शिक्षकांना परत पाठविण्याची संपूर्ण कार्यवाही होईपर्यंत बिंदुनामावली प्रस्तावास मंजुरी देण्यास असमर्थता दर्शविली असल्याने यवतमाळ प्राथमिक शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीची पदे भरण्यात येऊ नये, असे सहायक आयुक्तांना कळविले आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागांतर्गत मराठी माध्यम बिंदुनामावलीनुसार या शिक्षकांना रुजूसुद्धा केल्या जाणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रकि‘येतून येणार्‍या शिक्षकांना सध्या तरी यवतमाळ जिल्ह्यात रुजू करून घेण्यात येणार नाही.
Powered By Sangraha 9.0