वाघाडी नदीचे खोलीकरण करा

निःस्वार्थ सेवा फाऊंडेशनची मागणी

    दिनांक :23-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Deepening of Waghadi River : नगर परिषद अंतर्गत वाघाडी, सेवादासनगर, आर्णी रस्ता येथील वाघाडी नदीपात्राचे खोलीकरण करण्यात यावे. यासाठी निःस्वार्थ सेवा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले.
 
 
y23May-Waghadi
 
मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे वाघाडी परिसर जलमय झाला होता. २२ जुलै २०२३ च्या रात्री अंदाजे २ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत पाऊस झाला होता. त्या पाण्याने आलेल्या पुराने वाघाडी गावाला वेढा घातला होता. संपूर्ण वाघाडी परिसर जलमय झाल्यामुळे लोकांना स्वतःचा जीव वाचविणसाठी रात्री ३ पासून झाडावर चढून रात्र काढावी लागली होती. त्यात एका महिलेचा घर पडल्यामुळे दबून मृत्युसुद्धा झाला होता.
 
 
 
अनेक घरं जमीनदोस्त झाली. शेळ्या, गुरे, घरातील साहित्य, अन्नधान्य व कागदपत्रे वाहून गेली होती. ही परिस्थिती लक्षात घेता अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी मदतीचा हात पुढे करत वाघाडीवासींना त्या पुरातून सावरण्यास सर्वप्रकारे मदत केली होती. वाघाडीवासींना गतवर्षीपर्यंत पुराचा धोका नव्हता. परंतु गेल्या ३ वर्षांत या नदीपात्रात अँडरवॉटर ड्रेनेजचे काम झाले. तेव्हा खोदकाम केलेला मलबा बाहेर न टाकता नदीपात्रातच टाकल्याने नदीची खोली कमी झाली होती. या वस्तीमागील शेतमालकाने नदीचे मोठे पात्र वहितीत घेऊन नदीचा नाला करून टाकला आहे.
 
 
परिणामी वाघाडीवासींना पुराला सामोरे जावे लागल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली. किमान या वर्षी तरी ती वेळ या गरीब कुटुंबांवर येऊ नये या करिता यवतमाळ नगर पालिका आणि जिल्हाधिकाऱ्याना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
 
 
त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तरी उपाययोजना करून या लोकांचा जीव वाचवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाला वाघाडीच्या पुरामुळे होणाèया धोक्यांची माहिती असून आणि वारंवार निवेदने देऊन कोणीही लक्ष देत नसेल तर येणाèया पुराच्या संकटाला जबाबदार कोण, असा प्रश्न केला आहे. हे निवेदन देताना प्रा. घनश्याम दरणे, संकेत लांबट, परशुराम कडू, चेतना राऊत, कल्पना वाडवे, पूनम अलोणे, गजानन राठोड उपस्थित होते.