...खोटे कागदपत्र दाखवले आणि हडपली जमीन

26 May 2024 18:29:45
आमगाव,
खोट्या कागदपत्राच्या fake documents seized आधारे बोगस खाते उघडून त्याची शेती विकण्याचा डाव रचणारे बँकेचे कर्मचारी व शेतीची खरेदी विक्री करणारे दलाल यांचा डाव या शेतकर्‍याच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणाची या शेतकर्‍याने पोलिस व बँकेच्या वरिष्ठांना तक्रार करूनही पाच महिन्याचा कालावधी लोटला. मात्र त्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. बँकेच्या या बोगस खात्यामधून पाच लक्ष रुपयाची देवाण-घेवाण बँक कर्मचार्‍यांच्या संगम मताने झाली असावी, असा संशय या प्रकरणातील पीडित शेतकरी प्रल्हाद मनीराम कारंजेकर (62) यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना व्यक्त केला.
 

gdfgdfg 
प्रल्हाद कारंजेकर fake documents seized यांनी सांगितले की, कामठा रोडला गट क्र. 352 हे आर 2.02 आणि गट क्र.399 हे आर 0.26 त्यांच्या नावे शेती आहे. 22 नोव्हेंबर 2023 ला काही दलाल व व्यापारी त्यांच्या शेतावर येऊन गेले व शेतीची विक्री झाल्याची चर्चा कानावर आली. नंतर एका बँक कर्मचार्‍यांकडून कळले की माझ्या नावे बँकेत बोगस खाते उघडण्यात आले आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता माझ्या नावे नकली आधार कार्ड व इलेक्ट्रिक बिलचा वापर करून खाते उघडण्यात आल्याचे निदर्शनात आले. या खात्यातून पाच लक्ष रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे. जमिनीच्या खोटा सातबारा तयार करून दलालांनी शेतीची विक्री गोंदियातील एका व्यक्तीला केली व त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे या व्यवहारातून लक्षात आले. बँकेकडून छायांकित प्रत मागितले असता नकली आधार कार्ड, सातबारा व इतर कागदपत्रे खोटे असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला लिखित तक्रार दिली असता त्यांनी सदर व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू असे आश्‍वासन दिले. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता त्यांनी त्याला जबाबदार दोन बँक कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचे संकेत तर दिले मात्र काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे 20 डिसेंबर 2023 ला पोलीस अधीक्षक गोंदिया येथे तक्रार नोंदवली. या प्रकरणाला पाच महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेत बोगस खाते उघडून खोटे सातबाराच्या आधारे जमिनीची खरेदी विक्री करणार्‍या दलालावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बोगस खाते उघडण्याकरिता मदत करणार्‍या बँकेच्या कर्मचार्‍यांवर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रल्हाद कारंजेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
Powered By Sangraha 9.0