दहावी च्या निकालात विभागात वाशीम10th Result

27 May 2024 14:40:04
वाशीम
10th Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल आज, २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला असून, वाशीम जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९६.७१ एवढी आहे. बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही अमरावती विभागात वाशीम जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी आहे. नेहमी प्रमाणे निकालात मुलापेक्षा मुलींची टक्केवारी अधिक आहे.
 
 

10 th result 
 
इयत्ता दहावी च्या परीक्षेसाठी वाशीम जिल्ह्यातून एकूण १९६४१ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यामध्ये ११०७९ मुलांचा तर ८५६३ मुलींचा समावेश आहे. त्यात एकूण १८९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जाहीर झालेल्या निकालानानुसार १०२४६ विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत, ५७९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २५२२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४३७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७२ तर मुलींची ९८ टक्के आहे. दहावीच्या निकालात रिसोड तालुका अव्वलस्थानी असून, त्याची टक्केवारी ९८.३६ एवढी आहे. तर मंगरुळनाथ तालुका शेवटच्या स्थानावर असून, त्याची टक्केवारी ९५.०१ एवढी आहे. वाशीम तालुयाचा निकाल ९६.०३ टक्के, मालेगाव तालुका ९७.१४ टक्के, कारंजा तालुका ९५.९२, मानोरा तालुका ९७.८३ टक्के निकाल लागला. नेहमी प्रमाणे यंदाही १० वी च्या परीक्षेत मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली असून, ८५६२ पैकी ८३९१ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून, त्याची टक्केवारी ९८.०० टक्के आहे. तर ११०७७ विद्यार्थ्यापैकी १०६०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ९५.७२ टक्के आहे.10th Result
वाशीम जिल्ह्यातील १२८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. त्यात वाशीम तालुयातील २५, मालेगाव तालुका १८, रिसोड तालुका २०, कारंजा तालुका २७, मंगरुळनाथ तालुका २०, मानोरा तालुयातील १८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. निकाल पाहण्यासाठी शहरातील नेट कॅफेवर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. निकाल पाहल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये कही खुशी, कही गम असे चित्र पहावयास मिळाले.
Powered By Sangraha 9.0