गेमिंग झोनच्या मालकाचाही आगीत होरपळून मृत्यू

29 May 2024 10:35:07
राजकोट,
gaming zone राजकोटमधील टीआरपी गेम झोनचे मालक प्रकाश हिरण यांचा गेल्या आठवड्यात गेमिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या दुर्घटनेत लहान मुलांसह 30 जणांना जीव गमवावा लागला. अधिकाऱ्यांनी डीएनए चाचणीद्वारे प्रकाश हिरणची ओळख पटवली आहे. घटनास्थळी सापडलेल्या अवशेषांचे नमुने प्रकाश यांच्या आईच्या डीएनएशी जुळले असून, त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. प्रकाश हिरण हे TRP गेम झोनचे 60 टक्के शेअरहोल्डर होते. आग लागली त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकाश घटनास्थळी दिसत होता. वास्तविक, प्रकाश यांचा भाऊ जितेंद्र हिरण याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हेही वाचा : वर्धा ब्रेकिंग...कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हला आग
 

vbdgdt 
 
हेही वाचा : पणत्या तेवताहेत... आग लागल्यानंतर प्रकाश यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही, सर्व फोन नंबर बंद होते आणि प्रकाश यांची गाडी आगीच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्रच्या आवाहनानंतर कुटुंबाकडून डीएनए नमुने घेण्यात आले. डीएनए चाचण्यांनी पुष्टी केली की आग लागल्यानंतर ज्यांचे अवशेष सापडले त्यात प्रकाश यांचा समावेश आहे. gaming zone गेम झोनमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी हिरणसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. वास्तविक, राजकोट आगीनंतर मृतांच्या नातेवाइकांची डीएनए चाचणी केली जात आहे, परंतु आतापर्यंत केवळ 20 मृतदेहांची ओळख पटली आहे. हेही वाचा : ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!'
Powered By Sangraha 9.0