वर्धा ब्रेकिंग...कारंजा घाडगे येथे धावत्या ट्रॅव्हला आग

29 May 2024 09:28:44
वर्धा,
Wardha breaking शेगाव येथून नागपूरला परत जात असताना नागपूर - मुंबई महामार्गांवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र, ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला. ही घटना काल मंगळवार रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पालोरा पेट्रोल पंपजवळ घडली. हेही वाचा : ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!'
 

wardha 
 
हेही वाचा : गेमिंग झोनच्या मालकाचाही आगीत होरपळून मृत्यू  मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील भाविक शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेउन परत जात असताना पालोरा पेट्रोल पंप पुढे चालकाला ट्रॅव्हलरमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच थांबवली. वाहन थांबवताच प्रवासी बाहेर निघत नाही तोच संपूर्ण ट्रॅव्हल पेटली आणि जळून खाक झाली. Wardha breaking आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी विझविण्याचा प्रयत्न केला. तापमानात वाढ झाल्याने वाहनान आग लागल्याची घडत आहे. मागील आठ दिवसात जिल्ह्यात चार ठिकाणी वाहनाना आग लागल्याची घटना घडल्या. माहिती मिळताच कारंजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हेही वाचा : ‘बंगालच्या वाघा'चे स्मरण!
Powered By Sangraha 9.0