पदाधिका-यांचा लवाजमा आला, पण सांडपाणी बंद होईना

Bhandara-drainage सदनिकाधारक बिनधास्त, प्रशासन हातबल

    दिनांक :05-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
भंडारा, 
 
 
Bhandara-drainage गेल्या वर्षभरापासून एका वसाहतीतील रस्त्यावर येणारे सांडपाणी बंद व्हावे म्हणून तक्रार करूनही वसाहतीतील सदनिकाधारक आणि प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. Bhandara-drainage प्रशासनातील अधिका-यांनी सांगूनही उपाययोजना होत नसतील तर प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट होते. खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत रजनी नगर भागात असलेल्या एका फ्लॅट स्कीम मधील सांडपाणी वर्षभरापासून रस्त्यावर येत आहे. Bhandara-drainage बरेचदा तोंडी सांगून फ्लॅट धारकांनी त्यावर उपाययोजना केल्या नाही. हे प्रमाण अधिक झाल्यानंतर याची तक्रार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली. Bhandara-drainage जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी जागे झाल्यागत धावपळ करायला लागले.
 
 

Bhandara-drainage 
 
 
तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी ग्रामसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे एक-दोन अधिकारी आणि सरपंच त्या ठिकाणी पोहचल्या. सदनिकाधारक आणि इमारत बांधणारा कंत्राटदारही त्या ठिकाणी होता. Bhandara-drainage बराच वेळ चिंतन मंथन झाल्यानंतर रस्त्यावर पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी आणि ताबडतोब उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना करण्यात आल्या. त्यानंतर सदनिका धारकांना ग्रामपंचायतीने नोटीसही दिल्याचे समजते. मात्र आज या गोष्टीला पंधरा दिवस लोटूनही रस्त्यावर सांडपाण्याचा पूर वाहतच आहे. याच पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना ये-जा करावी लागते.Bhandara-drainage जिल्हाधिका-यांपर्यंत विषय जाऊनही सदनिका धारकांकडून त्यावर उपाययोजना केल्या जात नसतील ?
 
 
Bhandara-drainage ग्रामपंचायत प्रशासन हे सगळं उघडया डोळ्यांनी पहात असेल तर ग्रामपंचायतीच्या अधिका-यांचा उपयोग काय? या प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अधिका-यांची मवाळ भूमिका नागरिकांसाठी मनःस्ताप देणारी ठरत असून प्रशासनावरही अविश्वास निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहे. Bhandara-drainage सदनिका धारकांना नोटीस देण्यात आली आहे. पाणी बंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेल्या पाईपला कॅप लावली आहे. व्यवस्था करण्यास सांगितले असल्याची प्रतिक्रिया खोकरला ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नूतन बिसेन यांनी दिली.