बोर प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा पूर्ण

Bor Wildlife Sanctuary 178 अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिली सेवा

    दिनांक :05-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
वर्धा,
 
 
Bor Wildlife Sanctuary पर्यटकांना भुरळ घालणार्‍या बोर व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा मार्च आणि एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवून पूर्ण करण्यात आला आहे. Bor Wildlife Sanctuary या व्याघ्र गणनेचा अहवाल प्राप्त झाल्यावर बोर व्याघ्र प्रकल्पात नेमके किती वाघ आहेत याबाबतची माहिती पुढे येणार आहे. बोर या देशातील सर्वात छोट्या व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा पूर्ण झाला आहे. Bor Wildlife Sanctuary व्याघ्र गणनेदरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरांमध्ये कैद झालेल्या वन्यजीवांचे चित्रिकरण वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनल पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडून पाठविण्यात आले आहे.  बोरखेडी, बांबरडा, चामला गावात भिषण पाणीटंचाई
 

Bor Wildlife Sanctuary 
 
Bor Wildlife Sanctuary याच चित्रिकरणाचे सुक्ष्म अवलोकन करून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन देहरादून येथील तज्ज्ञांची चमू आपला अहवाल लवकरच बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला देणार आहे. याच अहवालाअंती बोर व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या नेमकी कितीने वाढली याबाबतची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. Bor Wildlife Sanctuary बोर व्याघ्र प्रकल्पात 16 मार्च ते 12 एप्रिल या काळात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा विशेष मोहीम राबवून पूर्ण करण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेरांचा वापर करण्यात आला. ट्रॅप कॅमेरांमधील चित्रिकरण पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनामार्फत वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनल तज्ज्ञांच्या चमूला देण्यात आले आहे. हे तज्ज्ञ सध्या प्राप्त चित्रिकरणाचे सुक्ष्म अवलोकन करीत आहेत. Bor Wildlife Sanctuary अवघ्या काही दिवसात वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनलचे तज्ज्ञ आपला अहवाल बोर व्याघ्र प्रकल्पाला देणार आहेत.
 
 
 
13 हजार 800 हेक्टरचा कोअर तर 67 हजार 814.46 हेक्टरचा बफर झोन असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा राबविताना एकूण 396 ट्रॅप कॅमेरांचा वापर करण्यात आला. Bor Wildlife Sanctuary  एका ग्रीड मध्ये किमान दोन ट्रॅप कॅमेरे लावून वन्यजीवांच्या हालचाली कैद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बोर व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा राबविण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक, पाच वनपरिक्षेत्र अधिकारी, 13 वनपाल, 53 वनरक्षक, 106 वनमजूर असे एकूण तब्बल 178 अधिकारी व कर्मचार्‍यांनी सेवा दिली. Bor Wildlife Sanctuary विशेष मोहीमेदरम्यान प्रत्येक दिवशी ट्रॅप कॅमेरा उत्तम काम करीत आहे काय याची शहानिशा करण्यात आली.