अज्ञाताने घराला लावली आग

Crime-Wardha-Fire दीड लाखांचे नुकसान

    दिनांक :05-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
हिंगणघाट, 
 
 
Crime-Wardha-Fire घरी कुणीही नसल्याची संधी साधून एका विकृत मानसिकतेच्या अज्ञाताने घरातील सर्व साहित्यांची राखरांगोळी करण्याच्या उद्देशाने आग लावली. Crime-Wardha-Fire ही घटना संत ज्ञानेश्‍वर वार्ड शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यात घरमालक अमित गोजे यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. Crime-Wardha-Fire  मिळालेल्या माहितीनुसार, अमित जोगे हे वाहतूक व्यावसायिक असून ते येथे एकटेच राहतात. सकाळी काही कामानिमित्त ते वर्धा येथे गेले होते. दरम्यान, दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी गोजे यांना फोनवरून माहिती दिली.  बोर प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा पूर्ण
 

Crime-Wardha-Fire 
 
Crime-Wardha-Fire घटनेची माहिती मिळताच ते बाहेरगावी राहणार्‍या आई व बहिणीसह परत आले. या दरम्यान शेजार्‍यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पोलिसांना माहिती मिळताच परिविक्षाधीन पोलिस अधिकारी तथा प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही आग मुद्दाम लावली असल्याचा संशय घरमालक अमित गोजे यांनी व्यक्त केला. Crime-Wardha-Fire आग लावणार्‍या अज्ञाताने बेडरूममधील लाकडी बेड, गाद्या, आंथरून, कपडे, टीवी यांना आग लावीत, घरातील गॅस सिलेंडरपर्यंत आग लागून मोठा स्फोट व्हावा, या वाईट हेतूने घरातील खिडक्या व दारांचे पडदे गॅस सिलिंडरपर्यंत पसरवून ठेवले होते. शेजार्‍यांनी आग विझविण्याच्या वेळी गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. Crime-Wardha-Fire या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक एल. डी. दुर्गे व हवालदार मुकेश येले तपास करीत आहे. बोरखेडी, बांबरडा, चामला गावात भिषण पाणीटंचाई