चिखला खाण कार्यालयासमोर संतप्तांचे आंदोलन

manganese mine-Vidarbha भूमिगत खाणीत दबून कामगाराचा मृत्यू

    दिनांक :05-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
गोबरवाही, 
 
 
manganese mine-Vidarbha चिखला येथील मॅग्नीजच्या भूमिगत खाणीत गधाघाट क्षेत्रात कार्यरत कंत्राटी मजूराचा मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. manganese mine-Vidarbha चेतन हेमराज शिवणे (38) असे मृत्यू मजूराचे नाव आहे. मॉयल द्वारा संचालित तुमसर तालुक्यातील चिखला येथे मॅग्नीजच्या सुप्रसिध्द खाणी आहेत. manganese mine-Vidarbha येथे शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास इतर कामगारांसह काम सुरू असताना अचानक कच्च्या मॅग्नीजचा मोठा ढिगार खचला. त्याखाली कंत्राटी कामगार चेतन शिवणे हा अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर चेतनचा मृतदेह आज रविवारी चिखला येथे आणण्यात आला.manganese mine-Vidarbha
 
 
manganese mine-Vidarbha
 
 पदाधिका-यांचा लवाजमा आला, पण सांडपाणी बंद होईना या दुर्घटनेनंतर पिडीत कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मृतदेह मॉयल खाण कार्यालयासमोर आणून धरणे आंदोलन केले. manganese mine-Vidarbha चर्चेअंती आंदोलक शांत झाल्याने जवळपास पाच तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. सदर दुर्घटनेच्या संदर्भात मॉयलच्याय सुरक्षा महासंचालकांनी खाणीतील अपघाताची चौकशी सुरू केली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच सदर अपघाताचे कारण कळू शकणार आहे. manganese mine-Vidarbha