मोटारपंप चोरट्यांना ठोकल्या बेड्या

thief-Wardha Police पंपसेट खरीददारही गवसला

    दिनांक :05-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
सिंदी (रेल्वे), 
 
 
thief-Wardha Police नजिकच्या कळमना शिवारातून 5 अश्‍वशक्तीचा वीज मोटारपंप सेट चोरून नेणार्‍या दोन भामट्यांना पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या. thief-Wardha Police शिवाय मुद्देमाल खरेदी करणार्‍याला देखील गजाआड केले. मिळालेल्या माहितीनुसार, 3 रोजी रात्री सुनील अवचट यांच्या शेतातील पाच अश्‍वशक्तीची वीज मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलिसांना शनिवारी प्राप्त झाली होती.thief-Wardha Police
 
 
thief-Wardha Police
 
बोरखेडी, बांबरडा, चामला गावात भिषण पाणीटंचाई  पोलिसांनी शोध घेतला असता गणेश भोयर (40) रा. कळमना आणि शंकर मुडे (27) रा. मारडा यांनी तो मोटारपंप भंगार खरेदीदार शहजाद शेख हबीब यांना विकली होती. thief-Wardha Police पोलिसांनी याप्रकरणी गणेश भोयर, शंकर मुडे व मुद्देमाल खरेदी करणारा शहजाद यांना त्वरित अटक केली. पोलिसांनी पंप सेट व एक दुचाकी असा 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, मकेश्‍वर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकूर, सूर्यवंशी, आनंद भस्मे, कांचन चाफले आदींनी केली.thief-Wardha Police