16 मे नंतर कापूस बियाणे शेतकर्‍यांना देणार

07 May 2024 15:50:52
अकोला,
Cotton seeds आता पुढच्या महिन्यात 7 जून रोजी मृग नक्षत्राच्या पर्वावर यंदाच्या खरीप हंगामाला सुरवात होणार असून या हंगामात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रीय पातळीवर त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी 16 मे पासून कापूस बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या दिनांकापूर्वी कापूस बियाण्याची विक्री संंबंधित घटकांनी केली तर संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई केली जाणार आहे. तेव्हा कापूस बियाणाची या तिथीपूर्वी कोणीही विक्री करू नये असे आदेश कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालकांना दिले आहेत.
 
 
 
Cotton seed
 
कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्यास तिचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे.असे कापूस शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होते व परिणामी त्यांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते असेही या तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी यंदा शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही. यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी गुरुवार, 16 मे पासून कापूस बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जाणार असून याची प्रत्यक्ष लागवड 1 जून नंतरच होणार आहे. तज्ज्ञांच्या या सूचनेचे जर शेतकर्‍यांनी आणि खते व बियाणे विक्री करणार्‍यांनी कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे.Cotton seeds त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करावी व विभागीय कृषि सहसंचालक यांनी त्यावर कटाक्षाने सनियंत्रण ठेवावे, अशा सूचनादेखील कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
 
1 जूननंतरच बियाणे लागवड करा
कापूस बियाण्याची विक्री दुकानदार यांनी शेतकर्‍यांना 15 मे नंतर करता येईल, परंतु शेतकरी बांधवांनी सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता 1 जून नंतरच बियाण्याची लागवड करावी, असे अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0