कोण आहेत कीर्तीवर्धन सिंह... ज्यांनी हरवले होते ब्रिजभूषण शरण ना !
10 Jun 2024 12:47:08
नवी दिल्ली,
कीर्तिवर्धन सिंह हेmodi cabinet पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. कीर्तिवर्धन यांचे वडील आनंद सिंह हे देखील गोंडा येथून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आधी ते काँग्रेसमध्ये होते, पण नंतर त्यांनी सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. कीर्ती वर्धन यांनीही सपामधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यावेळी त्यांनी गोंडातून विजयाची हॅट्ट्रिक साधली.
वडिलांचा विक्रम मोडला
गोंडा modi cabinet लोकसभा जागेवर आतापर्यंत 17 निवडणुका झाल्या आहेत. या जागेवरून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम आता कीर्तीवर्धन सिंह यांच्या नावावर होता, पण हा विक्रम त्यांच्याच मुलाने कीर्तीवर्धन सिंहने मोडला. कीर्तिवर्धन सिंह पाचव्यांदा या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले. ब्रिजभूषण शरण सिंह या जागेवर दोनदा विजयी झाले आहेत, तर त्यांची पत्नी केतकी देवी सिंह एकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.