तालुयातील सिंचन तलावाच्या दुरुस्तीची गरज

11 Jun 2024 17:19:35
मानोरा, 
irrigation pond तालुयामध्ये युती शासनाच्या काळात चौदा सिंचतन तलावाची निर्मीती झाली होती, त्यातील काही सिंचन तलावाच्या भिंती व व सांडव्याला भेगा व छिद्रे पडल्यामुळे प्रकल्पामधील पाणी वाहुन जात आहे, त्यामुळे ओलीताच्या क्षेत्रात घट होत आहे तसेच तलावाच्या भींतीवर मोठया प्रमाणात झाड़े झुडपे वाढली आहे. प्रकल्पाची दुरुस्ती झाली नाही तर फुटण्याची शयता नाकारता येत नाही. तेव्हा प्रशासनाने याची दखल घेऊन दुरुस्ती करुन भिंतीवरील झाडे तोड़ावी अशी मागणी शेतकर्‍याकडुन केली जात आहे.
 

fxhfghj 
 
 
तत्कालीन भाजपा शिवसेना युती शासनाच्या काळात स्व. आमदार गजाधर राठोड यांनी आपल्या कार्यकाळात मानोरा तालुयात १४ सिंचन प्रकल्प तयार केले होते, त्यामध्ये चिखली, वाईगौळ हे दोन प्रकल्प गेल्या दहा ते पंधरा वर्षापासुन धरणाच्या भिंतीमधुन व सांडव्यामध्ये भेगा व छिद्र पडल्यामुळे या मधुन पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जलसंधारण विभागाने शासनाकडे २०२२ मध्ये पाठविला आहे. यावर्षी तालुयात मोठया प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येणार्‍या काळात तलाव क्षेत्रात ढगफुटी वा अतिवृष्टी झाली तर फुटण्याची शयता नाकारता येत नाही.
तालुयातील चिखली, वाईगौळ, आमदरी, रुई, आसोला, गव्हा, गारटेक, चौसाळा, कार्ली , घानोरा भुसे, बोरव्हा, पंचाळा, वाटोद आदी सिंचन प्रकल्पावरील भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहे, तसेच कालव्याचे पाट ही जागो जागी फुटले, झुडपे वाढली आहे त्यामुळे शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पाणी पोहचत नाही.irrigation pond तसेच भिंती व सांडव्याची दुरुस्ती करुन झाडा झुडपाच्या काढणीसाठी प्रस्ताव जलसंधारण विभागाने २०२२ मध्ये अंदाजपत्रकासह शासनाकडे पाठवले आहे. तेव्हा शासनाने याकडे लक्ष घालुन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शेतकर्‍याकडुन होत आहे.
Powered By Sangraha 9.0