केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांचे समाधीचे दर्शन

13 Jun 2024 17:34:02
खामगांव,
Prataprao Jadhav बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार तथा नवनियुक्त़ केंद्रीय खासदार प्रतापराव जाधव यांचे आज दि.13 जून 2024 रोजी बुलढाणा जिल्हयात प्रथम आगमन प्रसंगी लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची समाधी स्थळी “शक्ती स्थळी” जाऊन भाऊसाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन समाधीस अभिवादन केले. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर हे देखील उपस्थित होते.
 

dgfsdg 
 
खामगांव शहरात येण्यापुर्वी शेगांव रोड वरील सिध्दीविनाय टेक्नीकल कॅम्पस येथे लोकनेते स्व़ भाऊसाहेब फुंडकर यांचे समाधीस्थळी जाऊन नवनियुक्त़ केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी स्व.भाऊसाहेबांच्या पुतळयास माल्यार्पण करुन समाधीस अभिवादन केले. यावेळी “अमर रहे अमर रहे लोकनेते स्व्.भाऊसाहेब अमर रहे” च्या घोषणा देण्यात आल्या.Prataprao Jadhav  यावेळी मा.आ.डॉ.श्री. संजयजी कुटे, खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर, मा.आ. श्री. संजयजी रायमूलकर, माजी आमदार श्री. शशिकांतजी खेडेकर, भाजप सोशल मीडिया सहसयोजक श्री. सागरदादा फुंडकर यांच्यासह भाजपा, भायुमो,महिला मोर्चा, विद्यार्थी आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थ‍ित होते.
Powered By Sangraha 9.0