जुलै अखेर पीककर्ज वाटप

13 Jun 2024 18:52:10
गोंदिया,
खरीप हंगामाला crop debt gondia सुरवात झाली आहे. शेतकर्‍यांना पीक कर्ज देताना त्यांची अडवणुक करू नये, जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित पीक कर्जाचा लक्षांक जुलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. त्या 13 जून रोजी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, मु‘य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजित आडसुळे, जिल्हा अग‘णी बँकेचे व्यवस्थापक नरेंद्र मडावी, जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार, बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राज कुरेकार, विद्युत विभागाचे ए. डी. भांडारकर, कृषी अधिकारी पवन मेश्राम, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अविनाश लाड उपस्थित होते.
 
 

crop debt  
ई-केवायसी crop debt gondia व अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करा. दुष्काळ सदृष्य भागात शासनाने ठरवून दिलेल्या सवलती शेतकर्‍यांना प्राधान्याने देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. चालू खरीप हंगामात आतापर्यंत 5 हजार 247 कोटी 7 लाख 58 हजार रुपयांच्या खरीप पीक कर्ज वाटपापैकी 2 लाख 14 हजार 897 शेतकर्‍यांना 1 हजार 819 कोटी 52 लाख 11 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी विभागातील 85 हजार 644 शेतकर्‍यांना द्यावयाचा निधी ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे प्रलंबित आहे. महसूल व कृषी विभागाने शेतकर्‍यांचे ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक करुन घेत पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करण्याचे आदेशही बिदरी यांनी दिले.
 
बियाण्यांचे crop debt gondia 658 आणि खतांचे 365 तसेच किटकनाशकाचे 42 नमूने काढण्यात आले असून गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत सादर करण्यात आले.बियाणे, खते, किसकनाशके व घ्यावयाच्या काळजी, तक‘ारी संदर्भात तक‘ार असल्यास टोल फ‘ी क‘मांक 18002334000 तथा मोबाईल व व्हाट्स क‘मांक 9373821174 वर तक‘ार करावी किंवा जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे यावेळी सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0