सीएम नितीश कुमार रुग्णालयात दाखल

15 Jun 2024 12:26:46
नवी दिल्ली,   
CM Nitish Kumar मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी सकाळी अचानक पाटण्यातील खासगी रुग्णालयात पोहोचले. त्याच्यावर ऑर्थो विभागात उपचार सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की सकाळी उठल्याबरोबर सीएम नितीश कुमार यांना हातामध्ये खूप दुखू लागले. यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेत खासगी हॉस्पिटल गाठले. मुख्यमंत्री नितीश बरे आहेत. ऑर्थो विभागाचे वरिष्ठ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
 
CM Nitish Kumar
 
यापूर्वी 14 मे रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत खराब झाली होती. त्यावेळी त्यांची सीएम हाऊसमधील डॉक्टरांच्या टीमने काळजी घेतली होती. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्र जारी करण्यात आले. त्यात मुख्यमंत्री नितीश कुमार आजारी असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळे 14 मेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पाटण्यात परतले. CM Nitish Kumar या काळात ते माध्यमांशी बोलले नाहीत. शुक्रवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये 25 महत्त्वाच्या अजेंडांना मंजुरी देण्यात आली. सीएम हाऊसच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएम नितीश कुमार पूर्णपणे निरोगी आहेत. हाताला दुखत असल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात गेले. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रुग्णालयातून सीएम हाऊसला परत आले.
Powered By Sangraha 9.0