त्रिपुराची दीदी...प्रतिमा भौमिक!

15 Jun 2024 13:47:12
नेत्री...युथ आयडॉल !
 
- शायना एनसी
 
Tripura-Pratima Bhowmik-MP महिला पुरुष असमानतेमुळे अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या निर्माण होतात. त्या पुढे जाऊन देशाच्या सर्वांगीण विकासाला मारक ठरतात. ही असमानता दूर करून, महिलांना समान संधी देऊन, त्यांचं सशक्तीकरण वेगानं करणं आवश्यक आहे. Tripura-Pratima Bhowmik-MP महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं तितकंच आवश्यक आहे. राजकारणाच्या क्लिष्ट क्षेत्रात महिलांनी त्यांचे पाय खंबीरपणे रोवले आहेत. असंच एक प्रेरक व्यक्तिमत्त्व आहेत प्रतिमा भौमिक! Tripura-Pratima Bhowmik-MP त्रिपुरा पश्चिममधून खासदार झालेल्या प्रतिमा भौमिक यांचा जन्म २८ मे १९६९ रोजी सिपईजला जिल्ह्यातील बारोनारायण गावात झाला. वडीलांचे नाव देवेंद्र कुमार आणि आईचे नाव कानन भौमिक! आगरतळा विद्यापीठातून जैवविज्ञान विषयात त्यांनी डिग्री घेतली. हेही वाचा : त्वरा करा ! पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम, '५ लाख गुंतवा आणि ...'
 
 
 
 
Tripura-Pratima Bhowmik-MP
 
 
 
 
हेही वाचा : स्वाती मलिवाल प्रकरणी नवीन अपडेट...बिभाव कुमार यांच्या न्यायिक कोठडीत वाढ ! वर्ष २०१९ मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. त्रिपुरा तीन बाजूंनी बांगलादेशला लागून आहे आणि हे अंतर थोडंथोडकं नाही तर ८९० किलोमीटर इतकं विस्तृत आहे. Tripura-Pratima Bhowmik-MP माझं गाव बारोनारायण पासून बांगलादेशाचं अंतर फक्त ३०० मीटर आहे. शेतकरी कुटुंबांतून आलेल्या प्रतिमा यांनी पहिल्यांदा चपला आगरतळ्याला कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावरच घालण्यास सुरुवात केली. तोपर्यंत कधी चपला घालायच्या असतात, असं माहितीच नव्हतं. तसा प्रघातही नव्हता, असं त्या जरा संकोचून सांगतात. अगदी संपन्न नसलं तरी खात्यापित्या कुटुंबातील प्रतिमा यांचं बालपण आईवडीलांच्या लाडाकोडात गेलं. ते सुशिक्षित होते. Tripura-Pratima Bhowmik-MP चार बहिणभावांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या प्रतिमा यांना आईवडीलांनी चांगलं शिक्षण दिलं. गावातील लोक म्हणायचे, लग्नच तर करायचं आहे मुलीचं...कशाला इतकं शिकवता? त्यावर माझे वडील प्रेमाने म्हणायचे, ती माझी मुलगी आणि मुलगाही आहे. मी असा भेद करणार नाही.
 
 
 
उर्वरीत भारताच्या तुलनेत ईशान्य भारत मागास होता. पायाभूत सुविधांचा अभाव, गरीबी आणि बेरोजगारीने ग्रस्त असलेल्या त्रिपुराच्या दयनीय अवस्थेचं कारण डावी विचारसरणी असल्याचं त्या सांगतात. संपर्क माध्यमांचा अभाव होता आणि केवळ दूरदर्शन-आकाशवाणीच्या माध्यमातून बातम्या कळत असत. राष्ट्रीय वृत्तपत्रंसुद्धा ३-४ दिवस उशिरा येत असत. Tripura-Pratima Bhowmik-MP हा काळ खूप आधीचा नाही तर अलिकडचा म्हणजे जेव्हा उर्वरीत भारतात संगणक क्रांतीला सुरुवात झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेची दारं जागतिक गुंतवणूकदारांसाठी खुली झाली होती, अशा ९०च्या दशकातील आहे. मागास हा शिक्का पुसून, निसर्गसौंदर्याची उधळ आणि खनिज संपत्तीने श्रीमंत असलेल्या त्रिपुराला जगापुढे आणण्यासाठी प्रतिमा भौमिक कार्यरत आहेत. प्रतिमा यांनी सिपाईजला या त्यांच्या जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायती आहेत. लहानमोठ्या गावांमध्ये महिला, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाचनालयांची सुरुवात केली.
 
 
 
Tripura-Pratima Bhowmik-MP या एकमेव जिल्ह्यात वाचनालयं आहेत. त्यासाठी, कपाटं, टेबल-खुर्च्या, पुस्तकं आणि वृत्तपत्रांची खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद केली. पण, ज्या दिवशीचं वृत्तपत्र लोकांना त्याच दिवशी वाचायला मिळावं, हा त्यांचा आग्रह आहे. शेतकऱ्यांना निधी मिळावा यासाठी त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यावर भर दिला. पुरेशी कागदपत्रं, ओळखपत्रं, बँकखाती नसल्यामुळे या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सरकारच्या चांगल्या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. मात्र, आता ते शक्य झालं असल्याचं प्रतिमा मोकळेपणाने सांगतात. तीन वेळा विधानसभा निवडणूक हारल्यानंतरही, कामाचा वेग कधीच कमी झाला नाही. राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता निर्माण केली. Tripura-Pratima Bhowmik-MP डाव्या विचारसरणीच्या प्रतिकूलतेला दूर करून, एम्स आणि न्युरोसर्जरी करणाऱ्या अद्ययावत रुग्णालयांची सुरुवात करण्यासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला.
 
 
 
त्रिपुराचाच नाही तर संपूर्ण ईशान्य भारताचा विकास बांगलादेश आणि म्यानमारला वगळून होऊ शकत नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आज या रुग्णालयांचा लाभ ५ कोटींपेक्षा जास्त लोक घेत आहेत. रेल्वेची सुविधा ईशान्य भारतात प्रभावीपणे स्थापित करण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. कोरोनाकाळात खासदार निधी सढळ हाताने खर्च केला आणि नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यास मदतीचा हात दिला.Tripura-Pratima Bhowmik-MP त्रिपुराची जनता, माझे कार्यकर्ता आणि त्यांचे कुटुंबीय हेच माझे कुटूंब आहे. लग्न करण्याचा विचार मी कधीच केला नाही. त्यांच्या लहानमोठ्या अडचणी सोडविण्यास माझं नेहमीच प्राधान्य असतं. मी कधीही हॉटेलमध्ये मुक्काम करत नाही तर कार्यकर्त्यांच्या घरीच माझा निवास असतो. त्यांचा आपलेपणा आणि प्रेम ही आपली मोठी शक्ती असल्याचं प्रतिमा मानतात.
 
 
 
आंतरराष्ट्रीय संबंधांवर विशेषत: इजरायल हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. Tripura-Pratima Bhowmik-MP त्या देशानं ज्याप्रमाणे प्रयोगशील शेती करून आश्चर्यकारक प्रगती केली आहे तसंच काही त्रिपुरात करण्याचा त्यांचा मानस आहे. त्रिपुरामध्ये कृषी विद्यापीठ सुरू करण्यासह, शेतीत नवं तंत्रज्ञान यायला हवं, यासाठी त्या काम करतात. त्रिपुरा ते दिल्ली थेट कनेक्टिव्हिटीचं स्वप्न नुकतंच साकार झालं असून, या मार्गावर दोन फ्लाईट्स सुरू झाल्या आहेत. राजकारणच नव्हे तर प्रत्येक सामाजिक क्षेत्रात महिलांनी यायलाच हवं, असा आग्रह त्या करतात. महिलांना समान संधी मिळायला हवी आणि महिलांनी त्या संधीचं सोनं करायला हवे, असं त्या ठामपणे सांगतात.
Powered By Sangraha 9.0