नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 भारतीय बाजारात सादर

16 Jun 2024 17:44:56
मुंबई, 
BMW R 1300 : बीएमडब्ल्यू मोटोराड इंडियाने भारतात नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस सादर केली आहे. ही साहसी मोटारसायकल परिपूर्ण बिल्ट-अप युनिट स्वरूपात उपलब्ध असेल. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह म्हणाले, बीएमडब्ल्यू मोटोराडने आर 80 जी/एस सह चार दशकांपूर्वी एन्ड्युरोस टूरिंगचा एक नवीन विभाग स्थापन केला आहे. तेव्हापासून बॉक्सर-इंजिन असलेली बीएमडब्ल्यू जीएस स्पर्धात्मक क्षेत्रात आघाडीवर नेता आहे.
 
 
BMW R 1300
 
BMW R 1300 : नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएससह कंपनीने जीएसला आणखी वेगवान बनविण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे ती कोणत्याही भूभागासाठी एक आदर्श मोटरसायकल ठरते. नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएसमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइंन आहे, जे पारंपरिक जीएस चिन्हांवर आधारित आहे. ही मोटारसायकल गतिमान आणि हलक्या स्वरूपाची आहे. आमच्या चमूने यात सर्व वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. फंक्शनल स्पोर्ट्स ग्रॅब हँडल ब्रिजसह स्पोर्टी, स्लीक पॅसेंजर सीटचा मागील भाग उंच आणि लहान आहे. बसताना प्रवाशांना खूप आरामदायी वाटते. मूळ आवृत्तीमध्ये मानक रायडर सीटची उंची 850 मिमी आहे.
Powered By Sangraha 9.0