रोखठोक
- अनिरुद्ध पांडे
Pakistan-terror-J&K जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा डोके वर काढत आहे. काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेला दणदणीत प्रतिसाद पाहून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. Pakistan-terror-J&K खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यास भारत सरकारला आलेले यश पाकला खुपत आहे. त्यामुळे अतिरेक्यांना पाठवून तिथे अशांतता, अस्थिरता निर्माण करायची आणि भविष्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका उधळून लावायच्या, हा पाकिस्तानचा कट आहे. Pakistan-terror-J&K गेल्या काही दिवसांत अतिरेक्यांकडून हल्ल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. नव्याने येऊ घातलेला दहशतवाद आताच ठेचून काढला पाहिजे. Pakistan-terror-J&K अन्यथा, ९० च्या दशकात होती तशी स्थिती पुन्हा निर्माण होईल आणि आजवर शांततेसाठी आम्ही जे प्रयत्न केलेत, ते व्यर्थ ठरतील. पाकिस्तानने ठरवून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांमार्फत हल्ले सुरू केले आहेत. पाकचा हा प्रयत्न एका मोठ्या कारस्थानाचा भाग असू शकतो, असा वास आता यायला लागला आहे. Pakistan-terror-J&K पीरपंजाल पर्वत शृंंखलेच्या दक्षिण भागात असलेल्या जम्मू भागात हल्ल्यांची सुरुवात झाली आहे.
जम्मूच्या रियासी जिल्ह्यात अतिरेक्यांनी हिंदू यात्रेकरूंना घेऊन जाणाèया बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्या घटनेत ९ जण मृत्युमुखी पडले आणि ३३ जण जखमी झाले. Pakistan-terror-J&K या घटनेची शाई वाळते न वाळते तोच कठुआ जिल्ह्यातील हिरानगर या हिंदुबहुल गावावर अतिरेक्यांनी हल्लाबोल केला. परंतु, सुरक्षा दलाच्या सतर्कतमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. हिरानगरवर झालेला हल्ला सुरक्षा दलाकडून परतवून लावला जात असतानाच अतिरेक्यांनी दोनशे किलोमीटर दूर असलेल्या डोडा जिल्ह्यात पोलिस आणि लष्कर यांच्या संयुक्त कॅम्पवर हल्ला केला. Pakistan-terror-J&K या हल्ल्यात ६ जवान जखमी झाले. सुमारे तासभर सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीनंतर सशस्त्र अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली असताना आणि तिथल्या जनतेचे खाण्यापिण्याचे वांदे झाले असताना हा भिकारडा पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो आहे, त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन भारतात घुसवतो आहे, यावर हसावे की रडावे? झालेल्या घटना लक्षात घेत मोदींच्या नेतृत्वातील कणखर सरकारने सुरक्षा दलांना खुली सूट दिली आहे.
अतिरेक्यांना दिसताक्षणी गोळ्या घातल्या तरी कुणी काही म्हणणार नाही. असे असले तरी जनतेला आणखी एका मजबूत सर्जिकल स्ट्राईकची अपेक्षा आहे. गेल्या वेळी केला होता त्यापेक्षाही दणकट सर्जिकल स्ट्राईक करावा, पाकिस्तानातील अतिरेक्यांचे सर्व अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि मगच विश्रांती घ्यावी. Pakistan-terror-J&K अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या मार्गात पाकिस्तानी लष्कर आडवे आले तर त्यांचाही पुरता बंदोबस्त करावा, ही जी जनतेची अपेक्षा आहे, ती अनाठायी नाहीच मुळात. सरकार सत्तेवर येऊन आता एक आठवडा झाला आहे आणि अतिरेक्यांनी ९ यात्रेकरूंना ठार मारल्याच्या घटनेलाही आठवडा उलटला आहे. घटनेचा बदला घेणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते आहे. सध्या जे हल्ले होत आहेत, ते पहाडी भागात होत आहेत. Pakistan-terror-J&K रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडून अतिरेकी सुरक्षा दलाचे जवान आणि नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करीत आहेत. गोळीबार केल्यानंतर ते घनदाट जंगलात पळून जात आहेत. याचाच अर्थ ते पूर्ण ट्रेनिंग घेऊन आले आहेत, पुरेशी रसद सोबत बाळगून आहेत, स्थानिकांचाही त्यांना पाठींबा मिळत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
Pakistan-terror-J&K अतिरेकी जंगलात लपून बसले असल्याने लष्कराने त्यांच्याविरोधात चालविलेल्या अभियानाला फारसे यश मिळालेले नाही. जम्मूत जे हल्ले झाले, त्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह दारूगोळा वापरण्यात आल्याचे आढळून आले आहे. अमेरिकी बनावटीच्या एम-४ या प्रगत रायफलीचा वापर झाला आहे. ५ मे रोजी जो हल्ला झाला होता, त्यात सामील आणि भारताला मोस्ट वॉण्टेड असलेला अतिरेकी हादून हा पाकिस्तानच्या स्पेशल सव्र्हिस ग्रुपचा सदस्य राहिलेला आहे. यावरून पाकिस्तानी लष्कर अतिरेक्यांना भारतात पाठविण्यात किती सक्रिय आहे, हे स्पष्ट होते. Pakistan-terror-J&K त्याचप्रमाणे हिरानगर येथे सुरक्षा दलांनी ठार मारलेला अतिरेकी अलीची पाकिस्तानी सोशल मीडियात लष्कराच्या गणवेशातील छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. सैनिक असल्याचे दाखवून त्याला श्रद्धांजली वाहिली गेली. ज्या काही घटना घडल्या आहेत, त्यावरून एक बाब स्पष्ट होते आणि ती म्हणजे पीरपंजाल पर्वतीय शृंखलेत असलेल्या घनदाट जंगलात मोठ्या संख्येत पाकिस्तानी अतिरेकी शस्त्रसाठा आणि दारूगोळा घेऊन त्याचप्रमाणे खाण्यापिण्याचा संपूर्ण बंदोबस्त करून लपून बसले आहेत.
जम्मू भागात अतिरेकी जंगलातून गावा-शहरांमध्ये येतात आणि हल्ला करून पुन्हा जंगलात दबा धरून बसतात. विशेष म्हणजे हे अतिरेकी घात लावून बसतात आणि बेसावध असलेल्या नागरिकांवर हल्ला करतात, सुरक्षा दलाच्या वाहनांना लक्ष्य करतात. समोरासमोर लढण्याची त्यांची क्षमता नाही. त्यामुळे लपूनछपून हल्ले करत दहशत निर्माण करायची, जेणेकरून कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर जी शांतता प्रस्थापित झाली होती, ती भंग होईल. Pakistan-terror-J&K अतिरेक्यांची हल्ले करण्याची पद्धत लक्षात घेता सुरक्षा दलांना आता ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा उपयोग करावा लागणार आहे. जंगलात दडून बसलेल्या अतिरेक्यांना हुडकून त्यांना कसे टिपायचे, याचे विशेष प्रशिक्षणही आपल्या जवानांना घ्यावे लागेल. तसे आपले जवान कमांडो प्रशिक्षण घेतलेले असतात. पण, अतिरेक्यांचा गनिमी कावा लक्षात घेता त्यांना त्यांच्याच पद्धतीने मारावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जे अतिरेकी काश्मिरात घुसले आहेत, त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकांमध्ये काम केल्याचे दिसून आले आहे. ते सगळे प्रशिक्षित आहेत. असे असले तरी ते स्वबळावर यशस्वी हल्ले करू शकत नाही. त्यामुळे त्यांना काश्मिरातील कट्टरपंथीयांचा छुपा पाठींबा आहे, याचाही अंदाज एव्हाना सरकारला आला आहे.Pakistan-terror-J&K
लष्करातील वाहने कुठून कुठे आणि केव्हा जाणार आहेत, याची माहिती देण्यासोबतच स्थानिक कट्टरपंथी या पाकिस्तानी अतिरेक्यांना कडाक्याच्या थंडीत वा पाऊस पडत असताना निवाराही उपलब्ध करून देत आहेत. त्याशिवाय, ते पहाडांवरील जंगलांमध्ये दडून बसूच शकत नाहीत, हेही स्पष्ट आहे. जंगलांमध्ये किती अतिरेकी लपले आहेत, त्यांची संख्या अजून निश्चितपणे कळलेली नाही. त्यामुळे त्यांना हुडकण्यासाठी लष्कराने विशेष मोहीम राबविली तर त्यात आपल्या जवानांचे किती बळी जातील, हे सांगता येत नाही. कारण, जंगल घनदाट आहे. Pakistan-terror-J&K अतिरेकी दबा धरून बसले असतात. थोडीही चाहूल लागली तरी ते गोळीबार करू शकतात, ग्रेनेड वा बॉम्ब फेकू शकतात. यात जवान हुतात्मा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळेच आधी ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अंदाज घेणे क्रमप्राप्त ठरते. शिवाय, जिथून हे अतिरेकी बाहेर येतात, त्याच्या जवळील गावांमधील कुणी त्यांना माहिती पुरवितो आहे काय, याचा कसून शोध घेतला पाहिजे. असे करतानाच सीमेपलीकडे जे अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यावर बंबार्डिंग करून त्यांना ठार मारले पाहिजे, ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि असे मजबूत अभियान सरकार चालवेल याची त्यांना खात्रीही वाटते.
Pakistan-terror-J&K भारत-पाकिस्तान सीमेवर जी भौगोलिक स्थिती आहे, ती लक्षात घेता तिकडून होणारी घुसखोरी पूर्णपणे थांबण्याची ग्वाही कुणीही देऊ शकत नाही. आज जे अतिरेकी आपल्या हद्दीत घुसले आहेत, त्या सगळ्यांचा सफाया करण्यात आपण यशस्वी ठरलो तरीही नजीकच्या भविष्यात पुन्हा ते घुसणारच नाहीत, याची खात्री देता येत नाही. आज जम्मूवर संकट ओढवले आहे. ते आपल्याला यशस्वीरीत्या हाणून पाडता आले नाही तर भविष्यात जम्मूला जवळ असलेल्या पंजाब आणि हिमाचल प्रदेशाला धोका उत्पन्न होऊ शकतो, ही बााब गांभीर्याने विचारात घ्यायला हवी. ९० च्या दशकात भारतात दहशतवाद सुरू झाला. पाकिस्तानी अतिरेक्यांनी हजारो काश्मिरी बांधवांना, विशेषत: काश्मिरी पंडितांना ठार मारले. Pakistan-terror-J&K असंख्य निष्पाप हिंदूंचे बळी गेले. असंख्य पंडितांनी खोèयातून पलायन केले. अतिशय वेदनादायी घटनाक्रम भारताने अनुभवला आहे. दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. हे चौथे दशक आहे. पण, आपण पाकिस्तानी अतिरेक्यांचा सफाया करण्यात अजूनही यशस्वी ठरलेलो नाही, हे कटू वास्तव आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून धाक जरूर निर्माण झाला आहे.
पण, मोदी तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते, तेव्हाच अतिरेक्यांनी हिंदू यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करून जे संकेत दिले, ते आम्ही गांभीर्यानेच घ्यायला हवेत. कालच पंतप्रधानांनी सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला, हे फार चांगले झाले. या बैठकीत काय ठरले याचा तपशील पुढे आला नसला तरी येत्या काही दिवसांत पाकिस्तानविरुद्ध काही ठोस कारवाई होते का, याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. Pakistan-terror-J&K मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचे कंबरडे मोडण्याचा आणि पाकिस्तानला धाकात ठेवण्याचा धाडसी प्रयत्न जरूर झाला. तेव्हापासून बालाकोटसारख्या मोठ्या घटना घडल्या नाहीत, हे वास्तव असले तरी अतिरेक्यांना भारतात ज्या ठिकाणांहून घुसता येते, ती घुसखोरीची ठिकाणं बंद करण्यात अजूनही आपल्याला यश आले नाही, ही बाब मान्य करावी लागेल. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द झाला. हे कलम कुणीही रद्द करू शकत नाही, मोदी सरकारने दहा जन्म घेतले तरी रद्द करता येणार नाही, अशा वल्गनाही आपण ऐकल्या.
परंतु, अमित शाह यांच्यासारखा कणखर गृहमंत्री मिळाल्याने आणि संसदेत संपूर्ण बहुमत असल्याने मोदींच्या नेतृत्वातील रालोआच्या सरकारने हे कलम रद्द केले. Pakistan-terror-J&K कलम निष्प्रभ झाले तर तिरंगा घ्यायला खांदाही मिळणार नाही, मोठ्या प्रमाणात रक्तपात होईल, अशी भीती दाखविण्यात आली. पण, झाले उलटेच. जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित झाली. दगडफेक बंद झाली. तरुणाई शिक्षण आणि रोजगाराकडे वळली. मोदी सरकारला उद्दिष्ट गाठण्यात यश मिळत असल्याचे दृष्टिपथात आले. नेमकी हीच बाब पाकिस्तानला खुपत राहिली. कुरापती काढणारा पाकिस्तान शांत बसेल तरी कसा? त्याने काही काळ शांत राहात आता वेगळ्या मार्गाने खोऱ्यात दहशत माजवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही कडक भूमिका घेतली नाही तर त्याचे दीर्घ काळ विपरीत परिणाम आम्हाला भोगावे लागू शकतात. Pakistan-terror-J&K मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. ते नक्कीच काहीतरी धाडस करतील, अशी चर्चा पाकिस्तानात गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. ती मोदींनी खरी करून दाखवावी. भारतीय सीमेलगत असलेल्या भागात दडलेल्या अतिरेक्यांचा सफाया करावाच, अतिरेक्यांना भारतात घुसवणाèया पाकी लष्करालाही धडा शिकवावा. अमेरिकेने ज्याप्रमाणे लादेनला घरात घुसून मारले होते, त्याचप्रमाणे पाकिस्तानी गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या प्रमुखालाही भारताने मारले पाहिजे.
अजित डोभाल यांच्यासारखे सुरक्षा सल्लागार असताना आणि आपल्याकडे मजबूत लष्कर व वायुदल असताना काळजी करण्याचे कारण नाही. यावेळी संपूर्ण ताकद लावून पाकिस्तानला जेरीस आणणे, ही आता गरज आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठे हल्ले करणे बंद केले आहे. भारताच्या इतर राज्यांमधून येणारे मजूर त्यांच्या ‘टार्गेट'वर आहेत. शिवाय, ज्या हिंदू विस्थापितांना सरकारने नोकऱ्या दिल्या आहेत, त्यांना ते मारत आहेत. Pakistan-terror-J&K अतिशय गंभीर प्रकार आहे हा. म्हणूनच आता जी कारवाई केली जाईल ती निर्णायक ठरायला हवी. या कारवाईनंतर पाकिस्तानातून एकही दहशतवादी भारतात घुसण्याची हिंमत करणार नाही, एवढी तडाखेबंद कारवाई व्हायला पाहिजे. दहशतवादावर स्थायी तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानी लष्कराचाही बंदोबस्त करावा लागेल आणि ती क्षमता भारतीय सैन्य दलात आहे, यावर सर्व भारतीयांचा पक्का विश्वास आहे.
९८८१७१७८२९