विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे...'यलो अलर्ट' जारी

17 Jun 2024 16:24:22
नागपूर,  
Yellow alert in Vidarbha महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. आज हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या मोसमी पावसाची उत्तरी सीमा स्थिर असून, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढचे पाच दिवस वाढली वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
 
rain
 
 
राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.  मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकणात काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Yellow alert in Vidarbha या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व नागपूरला १७ ते २१ जूनपर्यंत मेघगर्जना विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
  
 
 
Powered By Sangraha 9.0