जम्मूत हल्ल्यांचे थैमान!

17 Jun 2024 04:24:36
दिल्ली दिनांक 
 
 
- रवींद्र दाणी
 
terror-Reasi-Jammu तीन दिवसांत चार दहशतवादी हल्ले आणि हे सारे जम्मू भागात! पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बदललेल्या व्यूहरचनेची स्पष्ट जाणीव करून देणाऱ्या या घटना नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त साधून पाकिस्तानने घडविल्या. नवी दिल्लीत एखादी मोठी घटना घडत असताना, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडविणे, ही दहशतवाद्यांची आजवरची व्यूहरचना राहिलेली आहे. terror-Reasi-Jammu त्यानुसार हे सारे हल्ले करण्यात आले. २० मार्च २००० रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन नवी दिल्लीत संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार होते. तो मुहूर्त साधून दहशतवाद्यांनी काश्मीरच्या चेटिसिंगपुरा भागात ३६ काश्मिरी शिखांची हत्या केली होती. त्याची पुनरावृत्ती यावेळी पुन्हा करण्याचा प्रयत्न झाला.
 
terror-Reasi-Jammu
 
 
तीन दिवसांत, चार हल्ले!terror-Reasi-Jammu
हिंदू भाविक असलेल्या ज्या बसवर हा हल्ला करण्यात आला, ती बस रस्त्यालगतच्या एका नाल्यात कोसळल्याने अनेक प्रवासी बचावले. अन्यथा बसमध्ये बसलेल्या हिंदू भाविकांचे शिरकाण करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला असता.
नवे शस्त्र!terror-Reasi-Jammu
जम्मूच्या राईसी जिल्ह्यात बसवर करण्यात आलेल्या या हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे दहशतवाद्यांनी पाक लष्करात वापरल्या जाणाऱ्या बंदुकी न वापरता, अमेरिकन बनावटीच्या एम- ४ कार्बाईन वापरल्या. भारताला आपल्या विरोधात प्रचार करण्याची संधी मिळू नये म्हणून आयएसआयने ही खबरदारी घेतली असल्याचे सांगितले जाते. आजवर अशा प्रकारच्या हल्ल्यात चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे सापडत असत. आयएसआयने आपल्या व्यूहरचनेत केलेला हा नवा बदल आहे.
लष्करचा हात?terror-Reasi-Jammu
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला घडवून आणला असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे पाकिस्तानचे एक नेते नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना शुभेच्छा देणारा संदेश पाठविला. आपसातील वैमनस्य संपवून त्यात नव्या आशा-आकांक्षा यावर काम करू, असे आवाहन केले असताना हा हल्ला करण्यात आला. भारताबाबत विचार करताना, पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्या भूमिका परस्परविरोधी राहिलेल्या आहेत. पाकिस्तानी सरकारला भारताबरोबर शांततेचे संबंध हवे आहेत तर पाकिस्तानी लष्कराला ते मंजूर नाही. आजवर हे अनेकदा घडत होते, ते पुन्हा एकदा घडले.
 
दुसरा हल्ला terror-Reasi-Jammu
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मागील काही वर्षांत आपली व्यूहरचना बदलली असून त्यांनी काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मू भागात आपल्या कारवाया वाढविल्या आहेत. नुकतेच झालेले चारही हल्ले जम्मू भागात करण्यात आले, हे विशेष. दुसरा हल्ला तर भारत-पाक सीमेला लागून असलेल्या एका खेड्यात करण्यात आला. सैदा खेड्यात शिरलेल्या दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. तसेच जम्मूच्या डोडा जिल्ह्यात कोटा टॉप या जंगली भागातील भालेसा गावातही दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. दहशतवाद्यांनी जम्मू भागात कारवाया वाढविण्याचे मुख्य कारण म्हणजे या भागाची दुर्गम भौगोलिक स्थिती. काश्मीर खोऱ्यात भारत- पाक सीमेचा भाग तेवढा दुर्गम नाही, जेवढा तो जम्मू लगतच्या भागात आहे. terror-Reasi-Jammu जम्मू भागातून भारतीय सीमेत शिरणे थोडे अवघड असले तरी लपणे सोपे आहे, हे लक्षात आल्याने आयएसआय व दहशतवादी संघटनांनी ही नवी व्यूहरचना राबविणे सुरू केले आहे. यात त्यांना मिळणारा आणखी एक फायदा म्हणजे काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेल्या हल्ल्यात मुस्लिम मारले जातात. याने खोऱ्यातील जनमानस पाकिस्तानविरोधात जाते. ते आयएसआयला नको आहे. म्हणून आता जम्मू भागात हल्ले करून हिंदूंना लक्ष्य करण्याची व्यूहरचना राबविली जात आहे.
 
 
मोबाईल मनोरे
पाक अतिरेक्यांना भारतात पाठवून, नंतर त्यांच्याशी संपर्क ठेवणे सोपे व्हावे यासाठी पाकिस्तानने आपल्या सीमेत शक्तिशाली मोबाईल मनोरे उभारण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. भारतीय लष्कराला पकडता येणार नाही, असे नवे तंत्रज्ञान वापरून हे मनोरे उभे करण्यात आले असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तान भारतविरोधात आपल्या दहशतवादी कारवाया सोडावयास तयार नाही, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.terror-Reasi-Jammu
अनिष्ट संकेत
काश्मीरची जनता अद्याप देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात सामील होण्यास तयार नाही याचा मोठा संकेत बारामुल्ला लोकसभा मतदारसंघाच्या निकालाने दिला. बारामुल्लाचा निकाल धक्कादायक राहिला. २०१९ म्हणजे पाच वर्षांपासून तिहार कारागृहात स्थानबद्ध असलेले अब्दुल रशीद शेख हे अपक्ष उमेदवार दोन लाखांवर मतांनी विजयी झाले. अब्दुल रशीद शेख यांच्यावर दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचा गंभीर आरोप आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढविली आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांना पराभूत केले. terror-Reasi-Jammu अब्दुल रशीद शेख यांना ४ लाख ७२ हजार तर उमर अब्दुल्ला यांना २ लाख ६८ हजार मते मिळाली. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते साजिद गणी लोणे यांना १ लाख ७३ हजार मते मिळाली, तर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराची जमानत जप्त होत त्याला फक्त २७ हजार मते मिळाली. काश्मीर खोऱ्यात घडलेली एक सकारात्मक घटना म्हणजे यावेळी खोऱ्यात मतदान चांगले झाले. २०१९ च्या निवडणुकीत नाममात्र मतदान झाले होते आणि जनता लोकशाही प्रक्रियेत सामील झालेली दिसली.
 
निवडणुका लवकरच
जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात राज्यातील विधानसभा निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक आयोगानेही तसा मनोदय व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, हे आयोगाने म्हटले होते.terror-Reasi-Jammu
बारामुल्लाचे प्रश्नचिन्ह!
बारामुल्लाच्या निकालाने यावर एक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मतदारांनी काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांना नाकारीत कारागृहात बंदिस्त असलेल्या एका अतिरेक्यास विजयी करण्याचा निर्णय घेतला. खोऱ्यातील राजकीय पक्षांची विश्वसनीयता किती संपली याचा हा पुरावा मानला जातो. पण, ही बाब स्वागतार्ह मानली जाणार नाही. राजकीय पक्षांची विश्वसनीयता संपुष्टात आली तर काय होऊ शकते, हे बारामुल्लाच्या निकालाने दाखविले आहे.
 
पंजाबमध्येही...terror-Reasi-Jammu
सीमावर्ती पंजाबमध्येही अशीच एक घटना घडली आहे. खलिस्तानीसमर्थक अमृतपालसिंग हा खादूर साहिब मतदारसंघातून जवळपास दोन लाख मतांच्या मताधिक्याने विजयी झाला आहे. त्याने काँग्रेस, आम आदमी पक्ष व शिरोमणी अकाली दल या तिन्ही पक्षांचा पराभव करीत ही निवडणूक जिंकली अमृतपालसिंगच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे कारागृहात असताना त्याने ही निवडणूक जिंकली असून, त्याचे मताधिक्य राज्यात सर्वाधिक आहे. फरीदकोट मतदारसंघात उग्रवादी नेता सरबजितसिंग  खालसा यानेही ७० हजार मतांनी ही निवडणूक जिंकली आहे. एकीकडे राज्यात काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत असल्याचे दिसत असताना, राज्याच्या काही भागांत कट्टरपंथी खलिस्तानी समर्थकांचे पुनरागमन होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
 
 
terror-Reasi-Jammu पंजाबमधील निकालांची एक समाधानकारक बाब म्हणजे आम आदमी पक्षाचा झालेला दारुण पराभव. विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाला राज्यात लोकसभेच्या फक्त तीन जागा जिंकता आल्या. पंजाबच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांचे महत्त्व वाढले पाहिजे. शीख प्रभावाच्या जागा काँग्रेसला तर हिंदू प्रभावाच्या जागा भाजपाला असे आजवर होत होते. दुर्दैवाने भाजपाला राज्यात खाते उघडता आले नाही. काँग्रेसने सात जागा जिंकून पंजाबसाठी व देशासाठी चांगली कामगिरी बजावली आहे. भाजपालाही अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर या हिंदू प्रभावाच्या जागा मिळाल्या असत्या तर ते देशासाठी चांगले झाले असते.
Powered By Sangraha 9.0