ऑगस्ट महिन्यात विमानसेवा सुरू करा

खा. वानखेडे पोहचले बेलोरा विमानतळावर

    दिनांक :19-Jun-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
Belora Airport : बेलोरा विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात विमानसेवा सुरू करा. निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही खा. बळवंत वानखडे यांनी दिली. त्यांनी बुधवारी बेलोरा विमानतळावर जाऊन पाहणी केली.
 
 
kha
 
बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. धावपट्टीची लांबी 1800 मीटर झाली आहे. जवळपास 200 एकरात विस्तारलेले हे विमानतळ ऑगस्ट 2024 शुभमुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एटीआर स्वरूपाची 72 आसनी विमाने उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोयदेखील होणार आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल. असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. खा. वानखडे आणि माजी मंत्री सुनील देशमुख, वीरेंद्र जगताप विमानतळाची पाहणी करून अधिकार्‍यांशी चर्चा केली. विमानतळाचा उडान (आरसीएस) या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाईन्स यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होण्यासाठी मिशनमोडवर कामे करणे आवश्यक आहे. एमएडीसी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करून कामांना गती द्यावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे. बडनेरा- यवतमाळ वळणरस्त्याचे बांधकाम आणि नवीन टर्मिनल इमारतच्या कामांची पाहणी खा. वानखडे यांनी केली.