एअर इंडियाच्या दिल्ली-व्हॅन्कुव्हर विमानाचे 22 तासांनंतर उड्डाण

02 Jun 2024 17:31:57
मुंबई, 
Air India : शनिवारी एअर इंडियाचे दिल्लीहून व्हॅन्कुव्हरकडे जाणारे विमान अखेर 22 तासांच्या विलंबानंतर रविवारी पहाटे 3.15 वाजता रवाना झाले, असे सूत्राने सांगितले. शनिवारी पहाटे 5.30 वाजता हे विमान उड्डाण करणार होते; परंतु तांत्रिक समस्येमुळे विमान कंपनीला त्याचे वेळापत्रक बदलण्यास भाग पाडले. अखेर रविवारी पहाटे 3.15 वाजता या विमानाने आकाशात झेप घेतली.
 
 
Air India
 
 
Air India : एआय 185 विमानाला तांत्रिक समस्यांमुळे व त्यानंतर अनिवार्य फ्लाईट ड्युटी वेळेच्या मर्यादेत येणार्‍या क‘ूमुळे विलंब झाला. एअर इंडियाच्या अति-लांब पल्ल्याच्या उड्डाणांना एका किंवा दुसर्‍या कारणास्तव विलंबाचा सामना करावा लागण्याची गेल्या आठवड्यात किमान तिसरी वेळ होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले. तत्पूर्वी, 30 तासांपेक्षा जास्त विलंबानंतर एअरलाईनचे दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को विमान, जे मूलत: गुरुवारी सुमारे दुपारी 2.30 वाजता निघणार होते, दुसर्‍या दिवशी रात्री 9.55 वाजता उड्डाण केले. तथापि, मोठ्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल होत असूनही टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही.
Powered By Sangraha 9.0