मानोरा,
DP fire तालुयातील इंझोरी लगतच्या घोटी शेत शिवारातील शेतकर्यांना शेती सिंचीत करता यावी यासाठी नुकताच बसविण्यात आलेला रोहित शेतकर्यांच्या वीज जोडणी करण्याआधीच आगीच्या ज्वाळांनी वेढल्याने शेतकर्यांना अखंडित वीज मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
काल एक तारखेला घोटी शेत शिवारातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सुरळीत विविध सेवा मिळावी यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले होते. नवीन ट्रांसफार्मर ला शेतकर्यांची जोडणे करण्यापूर्वी ट्रांसफार्मर चार्जिंगसाठी लावण्यात आल्याची माहिती आहे. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर नवीन बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरने चक्क पेट घेतल्याने आगिच्या लोळात हे रोहित्र वेढल्या गेले होते.DP fire स्थानिक शेतकरी गणेश गावंडे यांनी वीज वितरण कंपनी प्रशासनाला सदर जळीत रोहित्र प्रकरणाची माहिती दिल्याने तातडीने कंपनी प्रशासनाने हालचाली करून वीज खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला.