अभिनय बेर्डे करणार रंगभूमीवर पदार्पण

    दिनांक :20-Jun-2024
Total Views |
मुंबई,
Abhinay Berde : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने मनोरंजनसृष्टत पदार्पण केले. अभिनयचा ‘ती सध्या काय करते’ हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला.
 

BARDE 
 
या चित्रपटानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज 4’ अशा अनेक चित्रपटात आला. यानंतर आता लवकरच तो व्यावसायिक रंगभूमीवर झळकणार आहे. ‘आज्जीबाई जोरात’ असे अभिनय बेर्डेच्या पहिल्या नाटकाचे नाव आहे. आता हे नाटक रंगभूमीवर कधी येणार, याची तारीख जाहीर झाली आहे. जिगीषा-अष्टविनायक निर्मित आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेले ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय बेर्डेचे हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे.