संस्कृती टिकविण्यासाठी धार्मिक स्थळे जपणे गरजेचे

केंद्रिय राज्यमंत्री जाधव यांचे प्रतिपादन

    दिनांक :24-Jun-2024
Total Views |
देऊळगावराजा, 
Union Minister Jadhav कुठलीही धार्मिक स्थळे असो मंदिर असतील त्या ठिकाणी सर्वांनाच चांगली शिकवण मिळते व त्यामुळे मनुष्य सुसंस्कृत होतो म्हणून माणूस सुसंस्कृत होण्यासाठी आपली संस्कृती टिकवण्यासाठी धार्मिक वआध्यात्मीक स्थळे टिकवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
 
 

vnghjgh 
 
महाराष्ट्र ही संताची भूमि असून याच जन्मभूमित 12 व्या शतकात विठुरायांचे भक्त संत चोखमेळा यांचा जन्म 14 जानेवारी 1268 ला महाराष्ट्राच्या मेहुनाराजा जन्मभूमित झाला. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या सर्व महान थोर संतानी चांगली शिकवण दिली. अशा महान संत चोखमेळा यांच्या जन्मभूमीत राज्यातील संत महंत व वारकरी यांचा सन्मान सोहळा योगेश जाधव यांनी 23 जून रोजी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना ना. जाधव बोलत होते. जगभरात राष्ट्रमाता मॉ जिजाऊ वसंत चोखामेळा यांचे जन्मस्थळ असलेल्या जन्मभूमीत स्वतंत्रपणे संत संमेलन आयोजित होत असलेले हे पहिले संमेलन ठरले. उपेक्षित राहिलेल्या नव्हे तर उपेक्षित ठेवलेल्या संताला आणि त्याच्या साहित्य प्रतिभेला उजाळा देण्याचा प्रयत्न या संमेलनातून झाला संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीत वारकर्‍यांचा सन्मान सोहळ्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव महंत बालक गिरीजी महाराज मंठा, प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूर, हभप प्रकाश महाराज जवंजाळ, गोसेवक संजय महाराज पाचपोर, प्रसिद्ध कीर्तनकार सुदाम महाराज पानेगावकर, ह भ प कांचनताई जगताप नाशिक, ह भ प अंजली केंद्रे लातूर, पुरुषोत्तम महाराज पाटील, युवा कीर्तनकार संतोष महाराज वनवे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आ. डॉ.शशिकांत खेडेकर माजी आमदार तोताराम कायंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्यासह अन्य कीर्तनकार उपस्थित होते Union Minister Jadhav प्रथमच संताची मांदियाळी होणार असून संत संमेलन पंचक्रोशीतील वारकर्‍यांचा सन्मान सोहळा देखील करण्यात आला. संत महात्म्यांचे विचार ऐकण्यासाठी परिसरातील किर्तनकार, विणेकरी टाळकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, चोपदार, परमार्थप्रेमी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश काकड, राजेश सपाटे, प्रदीप म्हस्के, सुनील मांटे, नागेश शिंगणे, प्रमोद काकडे अशोक खारडे, यांच्यासह योगेश जाधव फाउंडेशन योगेश जाधव मित्र मंडळ व वारकरी मंडळींनी परिश्रम घेतले.